आपला जिल्हा

मी मतदारदूत’ वाढवणार मतदानाची टक्केवारी 

मी मतदारदूत’ वाढवणार मतदानाची टक्केवारी 

अहिल्यानगर जिल्हा स्वीप समितीच्यावतीने ‘मतदारदूत’ उपक्रमात सहभागी होण्यासाठी आवाहन

अहिल्यानगर विजय कापसे दि २६ ऑक्टोबर २०२४जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागात मतदारांमध्ये जनजागृती करून मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी‌ ‘मी मतदारदूत’ ही संकल्पना राबविण्यासाठी मतदारदूतांची निवड केली जाणार आहे. ‘मतदारदूत’ या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा स्वीप समितीच्यावतीने नागरिकांना करण्यात आले आहे.

जाहिरात

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या निर्देशानुसार हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. उपक्रमासाठी उपक्रमासाठी उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहूल पाटील, शिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे, जिल्हा स्वीप समन्वयक अशोक कडूस यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

मतदानाच्यावेळी मतदान केंद्रांवर वृद्ध,‌ दिव्यांग व्यक्ती, गरोदर महिला यांना हे मतदारदूत मदत करतील. कवी, लेखक, साहित्यिक, सामाजिक, अध्यात्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, महिला, व्यापारी, उद्योजक, कला, क्रीडा, अभिनय, संगीत आदी विविध क्षेत्रातील तसेच व्याख्याते, किर्तन-प्रवचनकार क्षेत्रातील सकारात्मक सामाजिक प्रभाव असलेल्या व्यक्ती तसेच उत्कृष्ट जनसंपर्क, सभा-संमेलनात बोलण्याची उत्कृष्ट सवय असणाऱ्या व्यक्तींची ‘मतदारदूत’ म्हणून निवड केली जाणार आहे.

जाहिरात

मतदारदूत म्हणून निवड होण्यासाठी सदर सदस्य कुठल्याही राजकीय पक्षाशी निगडीत नसावा. मतदारदूत म्हणून काम करताना त्याने इतर कुठलेही राजकीय पक्षाचा प्रचार-प्रसार करू नये व आदर्श आचारसंहितेचे पालन करावे. त्याच्यावर कुठलाही प्रकारचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल असता कामा नये. भारत निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र व अहिल्यानगर जिल्हा स्वीप समिती यांचे विविध उपक्रम स्वतःच्या समाज माध्यमाद्वारे प्रसारित करावे. मतदार साक्षरतेशी संबंधित इतर वेगळे कुठलेही उपक्रम राबवायचे असल्यास ते राबविता येतील. त्याबरोबरच दैनंदिन व्यवसाय-नोकरी-कुटुंब वगैरे सांभाळून दैनंदिन संपर्कातील व्यक्तींना संस्थांना शंभर टक्के मतदान करण्याविषयी आवाहन करून त्याचा योग्य अहवाल सादर करणे अपेक्षित आहे. या उपक्रमातील सहभागासाठी कुठल्याही प्रकारचे मानधन देय नसून योग्य सन्मान केला जाईल.

मतदार जनजागृतीसाठी ‘मतदारदूत’ म्हणून सहभाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी डॉ.अमोल बागुल यांच्याशी ९५९५५४५५५५ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा आणि मतदानाद्वारे लोकशाही प्रक्रियेत सहभागी होऊन शंभर टक्के मतदानाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त इच्छूक‌ पात्र व्यक्तींनी या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा स्वीप समितीच्यावतीने करण्यात आले आहे. या उपक्रमाच्या यशस्विततेसाठी उपशिक्षणाधिकारी आकाश दरेकर, मीना शिवगुंडे, निवडणूक नायब तहसीलदार प्रशांत गोसावी व सर्व स्वीप समिती सदस्य आदी प्रयत्न करीत आहेत.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे