शिंगणापूर मध्ये प्रेरणा दिन साजरा करत स्व.कोल्हे यांना अभिवादन
शिंगणापूर मध्ये प्रेरणा दिन साजरा करत स्व.कोल्हे यांना अभिवादन
दिव्यगांना केले किराणा किटचे वाटप

कोपरगाव विजय कापसे दि २५ मार्च २०२५– कोपरगाव तालुक्याचे भाग्य विधाते माजी मंत्री सहकारमहर्षी स्व. शंकरराव कोल्हे यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी केलेल्या कार्याची प्रेरणा आजच्या युवा पिढीला मिळावी या उद्देशाने कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचा प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत प्रेरणा दिन साजरा करत गावातील दिव्यांगांना किराणा किटचे वाटप करण्यात आले.

या प्रसंगी शिंगणापूरचे लोकनियुक्त सरपंच डॉ. विजय काळे ग्रामपंचायत अधिकारी अविनाश पगारे, कैलास सवत्सकर, मच्छिंद्र लोणारी, बाळासाहेब विठ्ठल संवत्सरकर, भीमराव सवत्सरकर, दत्तात्रय सवत्सरकर, बाळूनाना सवत्सरकर, लहूभाऊ कुऱ्हे, ग्रामपंचायत सदस्य संजय तुळसकर, अरविंद संवत्सरकर, शाम सवत्सरकर, प्रसाद आढाव, अशोक वराट, दिनकर मोरे, प्रमोद सवंत्सरकर, भगवान सवंत्सरकर, बाळासाहेब सोनपसारे, शेखर कुऱ्हे, पंकज कू ऱ्हे, समाधान कुऱ्हे, कैलास कुऱ्हे, मनोज इंगळे, सतीश निकम, राहुल सुपेकर, रत्नाकर काळे, राजेंद्र काळे,मंगेश गायकवाड आदी संस्थेचे आजी माजी पदाधिकारी सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी, दिव्यांग बांधव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांनी माजी मंत्री स्व शंकरराव कोल्हे या कोपरगाव तालुक्यासह राज्यभरातील तळागाळातील लोकांसाठी केलेल्या कार्याची तसेच शिक्षण, सहकार, कला, शेती अशा सर्वच क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याच्या आठवणींना उजाळा देत माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे साहेब यांना जयंतीनिमित्त अभिवादन करत साहेब आपण चिरकाल आमच्या सोबत आहात अशा भावना व्यक्त केल्या.










