आपला जिल्हा
अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूलचा १०० टक्के निकाल
अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूलचा १०० टक्के निकाल
अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूलचा १०० टक्के निकाल

संगमनेर विजय कापसे दि १४ मे २०२५– अमृतवाहिनी संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त सौ शरयूताई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूल ने गुणवत्तेची परंपरा कायम राखली असून नुकत्याच जाहीर झालेल्या दहावी परीक्षेच्या निकालात घवघवीत यश मिळवत 100% निकालाची परंपरा कायम राखली आहे.


संवाद समन्वय अनुभव आणि उपक्रमशीलता या शाळेच्या विशेष उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूल मधून दिले जात असून ज्ञानवाढी बरोबरच कौशल्य विकासावर भर देण्याचे काम केले जात आहे.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे राज्याचे माजी महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ.सुधीर तांबे,संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त सौ.शरयू ताई देशमुख, डॉ.जयश्रीताई थोरात, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे ,व्यवस्थापक व्ही.बी.धुमाळ, डॉ.जे.बी.गुरव प्राचार्य सौ.जे.बी.सेटी यांसह सर्वांनी अभिनंदन केले आहे.