राज्य पत्रकार संघटनेच्या वतीने कोपरगावातील पत्रकारांची दिवाळी गोड
राज्य पत्रकार संघटनेच्या वतीने कोपरगावातील पत्रकारांची दिवाळी गोड
प्रदेश सरचिटणीस डॉ विश्वासराव आरोटे यांनी उपस्थित राहत दिल्या सर्वाना शुभेच्छा
कोपरगाव विजय कापसे दि ३१ ऑक्टोबर २०२४–सर्वाधिक पत्रकार सभासद असलेली महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटना नेहमीच सामाजिक उपक्रम राबवित असते त्याचाच एक भाग म्हणून बुधवार दि ३० ऑक्टोबर रोजी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस डॉ विश्वासराव आरोटे यांच्या संकल्पनेतून व शुभहस्ते तसेच संघटनेचे कोपरगाव तालुकाध्यक्ष जनार्दन जगताप, संगमनेर तालुकाध्यक्ष संजय गोपाळे यांच्या उपस्थितीत कोपरगाव येथील पत्रकारांना दिवाळी सणानिमित्त मिठाई व भेटवस्तूचे वाटप करत पत्रकारांची दिवाळी गोड केली तर नुकत्याच संपन्न झालेल्या पत्रकार सवांद यात्रेच्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
या प्रसंगी डॉ आरोटे यांनी बोलताना सांगितले की, सरकारी व्यवस्था कोणत्याही घटकाला न्याय देताना मतांच्या गाठयाचा विचार करत असल तर पत्रकार हा देखील एक मतांचा गठ्ठा असुन त्याचा मागण्याकडे देखील शासनाने लक्ष देयला हवे असल्याचे मत डॉ आरोटे यांनी व्यक्त करत प्रत्येक निवडणुकीत उमेदवारांच्या अथवा पक्षाच्या भूमिका विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पत्रकार व वृत्तपत्र ही माध्यमं अत्यंत आवश्यक असतात मात्र निवडणुकीनंतर लोकप्रतिनिधी या माध्यमाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असतो त्यामुळे पत्रकारांच्या अनेक मागण्या वर्षानुवर्ष तशाच प्रलंबित आहेत या सर्व बाबींचा विचार करत मार्गदर्शक संजयराव भोकरे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे कार्य महाराष्ट्रासह, मध्यप्रदेश, गोवा, गुजरात आदी राज्यात सुरू असून २७ हजाराहून अधिकचे सभासद असलेली एकमेव संघटना असून संघटनेच्या वतीने नुकतीच लोकशाहीच्या बळकटीसाठी,पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी वेगवेगळ्या मागण्यांच्या संदर्भात प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली दीक्षाभूमी ते मंत्रालय अशी पत्रकार संवाद यात्रा आयोजित करण्यात आली होती
या यात्रेस ठिकठिकाणी मोठा प्रतिसाद मिळाला होता त्यामुळे शासनाने देखील त्वरित दखल घेत पत्रकार व वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र महामंडळाची स्थापना केली हे नक्कीच आपले यश असून आगामी काळात देखील संघटना पत्रकारांच्या हितासाठी असलेल्या इतर सर्व मागण्या शासनाकडून पूर्ण करून घेणार असल्याचे सांगत.या विधानसभा निवडणुकीत उभ्या असलेल्या प्रत्येक उमेदवाराने आपल्या जाहीरनाम्यात पात्रकारांच्या मागणीचा उल्लेख करत त्या सोडवण्यासाठी कटिबद्ध राहिला तर पत्रकार सदैव त्याचा सोबत राहील असे मत डॉ आरोटे यांनी व्यक्त करत उपस्थित सर्व पत्रकारांना व त्यांच्या परिवाराला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे कोपरगाव शहराध्यक्ष हफिज शेख, कार्याध्यक्ष बिपिन गायकवाड, उपाध्यक्ष स्वप्नील कोपरे, ज्येष्ठ पत्रकार फकीरराव टेके, युसूफ रंगरेज, संतोष जाधव,सोमनाथ सोनपसारे, किसन पवार, विनोद जवरे, राहुल कोळगे, अमोल गायकवाड, सोमनाथ डफळ, राजेंद्र तासकर,रवींद्र जगताप, अक्षय काळे, काकासाहेब खर्डे, गणेश बत्तासे, मधुकर वक्ते, दीपेश डफळ आदी कोपरगाव तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते.
तर या प्रसंगी संगमनेर तालुकाध्यक्ष संजय गोपाळे व कोपरगाव तालुकाध्यक्ष जगताप यांनी देखील सर्व पात्रकारांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार तालुका सचिव प्रा. विजय कापसे यांनी व्यक्त केले.