आपला जिल्हा

मतदार जनजागृतीत सामाजिक संघटनांनी सहभागी व्हावे – निवडणूक निर्णय अधिकारी सायली सोळंके

मतदार जनजागृतीत सामाजिक संघटनांनी सहभागी व्हावे – निवडणूक निर्णय अधिकारी सायली सोळंके

मतदार जनजागृतीत सामाजिक संघटनांनी सहभागी व्हावे – निवडणूक निर्णय अधिकारी सायली सोळंके

कोपरगाव विजय कापसे दि ४ नोव्हेंबर २०२४कोपरगांव विधानसभा निवडणुकीत विविध सामाजिक संघटना, संस्था यांचा सहभाग महत्त्वाचा असून राष्ट्रीय कर्तव्य भावनेने मतदारांना जागृत करण्याचे आवाहन कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सायली सोळंके यांनी केले.

जाहिरात

कोपरगांव विधानसभा मतदारसंघात मतदारांमध्ये व्यापक जनजागृती मोहीम राबविली जात आहे. याचाच एक भाग म्हणून रोटरी क्लब ऑफ कोपरगांव सेन्ट्रलच्यावतीने मतदार जागृतीविषयी घोषवाक्य असलेल्या भित्तीपत्रकाचे अनावरण करण्यात आले. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.

या प्रसंगी तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी महेश सावंत, नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक सुहास जगताप, ज्येष्ठ नागरिक सेवा मंचच्या सुधाभाभी ठोळे, विजय बंब, योगाचार्य उत्तमभाई शहा, स्वच्छतादूत सुशांत घोडके, रोटरी क्लबचे अध्यक्ष राकेश काले,रिंकेश नरोडे,रोहित वाघ, अमर नरोडे, महेंद्र गवळी, विरेश अग्रवाल, विशाल आढाव, कृष्णाजी कुदळे आदी उपस्थित होते.

जाहिरात

मतदार जनजागृती संदर्भात चित्रकला स्पर्धा, जनजागृती फेरी, तसेच माध्यम कक्ष असे विविध उपक्रम हाती घेतले असल्याचे श्री.सावंत यांनी सांगितले.

सुदृढ लोकशाहीसाठी, देशासाठी मतदारांनी उत्स्फूर्त मतदान करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. भित्तीपत्रके कोपरगांवातील दुकाने, सार्वजनिक ठिकाणी लावण्यात येणार आहेत.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे