आदिनाथ ढाकणेआपला जिल्हा
गोदामाईच्या वतीने गोदापात्रातील महिलांची दिवाळी गोड
गोदामाईच्या वतीने गोदापात्रातील महिलांची दिवाळी गोड
गोदामाईच्या वतीने गोदापात्रातील महिलांची दिवाळी गोड
कोपरगाव विजय कापसे दि ८ नोव्हेंबर २०२४– सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरू असताना या समाजात असेही काही कुटुंब आहे की ज्यांना दोन वेळच्या जेवणाची पंचायत असते त्यामुळे त्यांच्या कुटुंबात दिवाळी सण म्हणावा असा साजरा होत नाही किंबहुना साजरा पण होत नाही याचं बाबीचा विचार करत अशाच काही कुटुंबातील महिलांची कोपरगाव शहरातील नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या कोपरगाव येथील गोदामाई प्रतिष्ठानने त्यांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न केला आहे.
सविस्तर वृत्त असे की, कोपरगाव शहरातून होणाऱ्या पवित्र अशा गोदावरी नदी पात्रात श्रद्धाळू भाविकांनी श्रद्धेपोटी पैशांची नाणी टाकलेली असतात ती वाळू पाण्या मधील पैशांची नाणी शोधून आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतात अशा गोरगरीब निराधार महिलांना कोपरगाव येथील गोदामाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे यांच्या संकल्पनेतून दिवाळी सणानिमित्त फराळ व मिठाई वाटप करत त्यांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न केला असून त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.