श्री काळभैरवनाथ जयंती सोहळा चांदेकसारे येथे होणार उत्साहात साजरा- संदीप विदुर (ज्योतिष भास्कराचार्य)
श्री काळभैरवनाथ जयंती सोहळा चांदेकसारे येथे होणार उत्साहात साजरा- संदीप विदुर (ज्योतिष भास्कराचार्य)
श्री काळभैरवनाथ जयंती सोहळा चांदेकसारे येथे होणार उत्साहात साजरा- संदीप विदुर (ज्योतिष भास्कराचार्य)
कोपरगाव विजय कापसे दि २२ नोव्हेंबर २०२४– कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील दत्त मंदिराशेजारील श्री कालभैरवनाथ देवस्थानच्या वतीने श्री काळभैरवनाथ जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होणार असल्याची माहिती प्रसिद्ध ज्योतिष्य भास्कराचार्य संदीप विदुर यांनी दिली आहे.
याविषयी आयोजक संदीप विदुर यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, सालाबाद प्रमाणे याही वर्षी चांदेकसारे येथील दत्त मंदिरा शेजारील श्री काळभैरवनाथ देवस्थानच्या वतीने शनिवार दि २३ नोव्हेंबर रोजी श्री काळभैरवनाथ यांचा जयंती सोहळा साजरा होणार असून या सोहळ्याचे हे १५ वे वर्ष आहे. या जयंतीनिमित्त राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज आश्रम समाधीस्थान बेट कोपरगाव येथील मठाधिपती प.पु रमेशगिरीजी महाराज, कोपरगाव दत्तपार येथील बालब्रम्हचारी प.पु अरविंद महाराज तसेच माऊली आश्रम जेऊर पाटोदा येथील ह.भ.प नवनाथ महाराज यांच्या शुभ आशीर्वादाने सकाळी १० ते १२ या वेळेत पालखी सोहळा संपन्न होऊन त्यानंतर दुपारी १२ ते ५ वाजेपर्यंत उपस्थित सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.
तरी सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहून या सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन ज्योतिष्य भास्कराचार्य संदीप विदुर यांनी केले असून हा सोहळा यशस्वीतेसाठी श्री काळभैरवनाथ समस्त भाविक भक्त तसेच चांदेकसारे ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभणार आहे.