कोपरगाव शहरात लावलेल्या त्या फ्लेक्स बोर्डची सर्वदूर मोठी चर्चा
विकी जोशी यांनी लावलेला तो शुभेच्छा बोर्ड
कोपरगाव विजय कापसे दि २२ नोव्हेंबर २०२४– महाराष्ट्र विधानसभेकरीता बुधवार दि २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान प्रक्रिया संपन्न झाली असून यात कोपरगाव मतदार संघात महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विद्यमान आमदार आशुतोष काळे सह १२ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशिनमध्ये मतदार राजाने बंद केले असून उद्या शनिवार दि २३ नोव्हेंबर रोजी प्रत्यक्षात सकाळी ८ वाजेपासून कोपरगाव शहरातील सेवा निकेतन या शाळेमध्ये एकूण २० टेबल वर १९ फेऱ्या द्वारे मतमोजणी संपन्न होऊन अवघ्या काही मिनिटांत पहिला कल व अवघ्या काही तासात निकाल जाहीर होईल.
उद्या २३ नोव्हेंबर रोजी जाहीर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले असून या साठी अवघे काही तास शिल्लक असतांना कोपरगाव शहरात महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार आशुतोष काळे यांच्या एका कट्टर समर्थकाने निवडणूक निकालाच्या आधीच कोपरगाव शहरात लावलेल्या तसेच सोशल मीडिया वर जोरदार फिरत असलेल्या आमदार नव्हे मंत्रीसाहेब…! आशुतोषदादा काळे साहेब भरघोस मतांनी विजयी झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन…! या आशयाच्या फ्लेक्स बोर्ड ची व सोशल मीडियावर फिरत असलेल्या पोस्ट ची सर्वत्र जोरदार चर्चा होत असल्याने चर्चेला उधाण आले आहे.
सविस्तर वृत्त असे की, विद्यमान आमदार आशुतोष काळे यांचे कट्टर समर्थक म्हणून सर्व परिचित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे कोपरगाव शहर संघटक तसेच आदर्श युथ क्लबचे विकी जोशी यांनी कोपरगाव शहरातील सावरकर चौक सुदेश थिएटर परिसरातील वाणी यांच्या दुकानावर आमदार नव्हे मंत्रीसाहेब,आशुतोषदादा काळे भरघोस मतांनी विजयी झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन..अशा आशयाचा फ्लेक्स लावल्याने तसेच सोशल मीडियावर सर्वत्र फिरत असल्याने या फ्लेक्सची व पोस्ट ची सर्वत्र जोरदार चर्चा होत असून शहरातून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांचे हा भव्य फ्लेक्स लक्ष वेधून घेत आहे.