संजीवनी सैनिकी स्कूल व ज्यु. कॉलेजचे ब्रास बॅन्ड पथक देशात विभागीय पातळीवरील स्पर्धेत दुसरे
संजीवनी सैनिकी स्कूल व ज्यु. कॉलेजचे ब्रास बॅन्ड पथक देशात विभागीय पातळीवरील स्पर्धेत दुसरे
स्पर्धेत पहिल्याच वर्षी सहभाग, सात राज्यातुन मारली मुसंडी
कोपरगांव विजय कापसे दि ३० नोव्हेंबर २०२४- संजीवनी सैनिकी स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या ३१ विद्यार्थ्यांच्या ब्रास बॅन्ड पथकाने संरक्षण मंत्रालय, भारत सरकार पुरस्कृत सार्वजनिक सुचना संचालनालय, मध्य प्रदेश सरकारने भोपाळ येथे पश्चिम विभागीय महाराष्ट्र , दिव दमण, गुजरात, दादरा नगर हवेली, गोवा, मध्य प्रदेश व राजस्थान या राज्यांतील व केद्रशशित प्रदेशातील ब्रास बॅन्ड २०२४-२५ या स्पर्धांमध्ये शानदार प्रदर्शन न करून दुसरा क्रमांक मिळविला. आम्ही कोठेही मागे नाही, हे पुन्हा एकदा संजीवनीने दाखवुन दिले आहे, अशी माहिती संस्थेच्या वतीने प्रसिध्दी पत्रकात देण्यात आली आहे.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक स्व. शंकरराव कोल्हे यांची आपल्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये भाग घेवुन प्राविण्य मिळवावे, अशी तिव्र इच्छा असायची. त्याअनुषंगाने संजीवनीचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे व विश्वस्त सुमित कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनीचे विद्यार्थी विविध क्षेत्रात नैपुण्य मिळवित आहेत. त्यांनी प्राचार्य कैलास दरेकर, संगीत शिक्षक महेश गुरव व देवेंद्र मकवाना, वसतिगृह अधिक्षक विजय भास्कर व गुणवंत कलाकारांचे अभिनंदन केले आहे.
यापुर्वी पुणे येथे राज्यस्तरीय स्पर्धा आक्टोबर मध्ये झाल्या होत्या. तेथे एकुण १२ संघांतुन संजीवनीच्या संघाने प्रथम क्रमांक मिळवुन भोपाळ येथिल विभागीय पातळीवरील स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. इतर राज्यांच्या संघात इयत्ता १२ वीचे स्पर्धक होते. मात्र संजीवनीच्या संघात इयत्ता ८ वीचे १५ विद्यार्थी, इयत्ता ९ वीचे १० विद्यार्थी, इयत्ता १० वीचे ५ विद्यार्थी व इयत्ता ११ वीचा १ विद्यार्थी असे कलाकार होते. अगदी निसटत्या फरकाने १ ला क्रमांक गेला. संजीवनीच्या कलाकारांनी ब्रास बॅन्ड वर आठ देश भक्तीपर गीतांचे सादरीकरण संचालनासह सादर केले.
सध्या संजीवनीमध्ये संगीताचे सर्व आधुनिक साहित्य उपलब्ध असुन ६० विद्यार्थी ब्रास बॅन्डचे प्रशिक्षण घेत आहे. अशा विद्यार्थ्यांना भारतीय संरक्षण दलाचे विविध विभाग, पोलीस, रेल्वे अशा विविध विभागांच्या बॅन्ड पथकात नोकरीची मोठी संधी आहे. सर्व गुण संपन्न कॅडेटस् घडवायचे, या हेतुने व्यवस्थापनाच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक आपले कर्तव्य बजावत असतात. भोपाळ येथे संजीवनीच्या संघास मध्य प्रदेशषच्या शिक्षण आयुक्त श्रीमती शिल्पा गुप्ता यांचे हस्ते ट्रॉफी (विजय चिन्ह), प्रमाणपत्रे व ७ हजार रुपयांचे रोख बक्षिस देण्यात आले.