संजीवनी सैनिकी स्कूल अँड ज्यु.कॉलेजमध्ये वार्षिक क्रीडा पारीतोषिक समारंभ संपन्न
संजीवनी सैनिकी स्कूल अँड ज्यु.कॉलेजमध्ये वार्षिक क्रीडा पारीतोषिक समारंभ संपन्न
खेळातुन मन भक्कम बनते-डॉ. प्रितम जपे
कोपरगांव विजय कापसे दि १९ डिसेंबर २०२४: वेगवेगळे खेळ खेळत असताना त्यात आव्हाने येतात, आव्हानांना सामोरे जाण्यासाठी मनाची व कौशल्यांची साथ लागते. यातुन मन भक्कम बनते आणि आयुष्यभर भक्कम मनाची ठेवण आपल्याला उपयोगी पडते. खेळातुन दुर्दम्य इच्छा शक्ती वाढीस लागते, असे प्रतिपादन कोपरगांव येथिल प्रसिध्द आर्थोपेडिक्स सर्जन डॉ. प्रितम जपे यांनी केले.
संजीवनी सैनिकी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाच्या पारीतोषिक वितरण समारंभात डॉ. जपे प्रमुख पाहुणे म्हणुन बोलत होते. संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे विश्वस्त सुमित कोल्हे हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी व्यासपीठावर दुसरे पाहुणे उद्योजक रविंद्र आढाव, प्राचार्य कैलास दरेकर, वसतिगृह अधिक्षक विजय भास्कर उपस्थित होते. तीन दिवस चाललेल्या २३ प्रकारच्या विविध क्रीडा स्पर्धामध्ये एकुण ३६० खेळाडूंनी सहभाग नोंदविला, यातील ७० खेळाडू बक्षिसाचे मानकरी ठरले. चार हाऊस पैकी नेताजी सुभाषचंद्र बोस तर खेळाडूंमध्ये माधव ज्ञानदेव दाभाडे याने जनरल चम्पियनशिप मिळविली.
डॉ. जपे पुढे म्हणाले की कधी कधी खेळातील अपयश जिध्द शिकविते. याचे उदाहरण देताना ते म्हणाले की जगप्रसिध्द बास्केटबॉल खेळाडू मायकेल जॉर्डन यांची त्यांच्या शाळेतील बास्केटबॉल टीम मध्ये निवड झाली नाही. याची खंत त्यांना कायम अस्वस्थ करायची. यावर त्यांनी जिध्दीने भरपुर सराव केला आणि जगप्रसिध्द बास्केटबॉल खेळाडू बनले. अपयशाने खचुन न जाता प्रयत्न करत रहावे. खेळात जिंकल्यावर उन्माद करू नका कारण उद्या आपण हारूही शकतो. हार जीत तात्पुरत्या असतात. जे हारतात त्यांनी पुन्हा संधी घ्यावी. चांगल्या खेळाडूलाही खडतर सराव करणारा खेळाडू हारवु शकतो, म्हणुन आपापल्या खेळाचा कायम सराव ठेवा.त्यामुळे आपली हाडे, स्नायु, मनस्थिती चांगली राहुन सामाजिक ओळख निर्माण होईल.
संस्थेचे संस्थापक स्व. शंकरराव कोल्हे यांच्याबध्दल बोलताना डॉ. जपे म्हणाले की अशी माणसे दुर्मिळ जन्माला येतात. त्यांच्यामुळे कोपरगांवचा विकास झाला व म्हणुनच आपण सर्वजण येथे आहोत. त्यांच्या दुरदृष्टीतून संजीवनी परीवार बहरत आहे.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना सुमित कोल्हे म्हणाले की आपले विद्यार्थी बाहेर सुध्दा शिस्तीने वागतात, हे लोक आम्हाला सांगतात तेव्हा अभिमान वाटतो. संजीवनीचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आपली संस्था कटीबध्द आहे. भविष्यात कोठेही स्पर्धा असल्यातरी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा. त्यांना संस्थेकडून पुर्ण मार्गदर्शन आणि हवे ते सहकार्य केल्या जाईल. उत्कृष्ट आणि शिस्तबध्द क्रीडा महोत्सवाचे आयोजन केल्याबध्दल त्यांनी सर्व संबंधितांचे अभिनंदन केले. तर शेवटी भास्कर यांनी आभार मानले.