आर्यवीर कराटे हॉल मध्ये ब्लॅक बेल्ट परीक्षा आणि कॅम्प यशस्वी संपन्न
आर्यवीर कराटे हॉल मध्ये ब्लॅक बेल्ट परीक्षा आणि कॅम्प यशस्वी संपन्न
आर्यवीर कराटे हॉल मध्ये ब्लॅक बेल्ट परीक्षा आणि कॅम्प यशस्वी संपन्न

कोपरगाव विजय कापसे दि ९ मे २०२५– आर्यवीर कराटे हॉल कोपरगाव येथे दि ४ मे २०२५ ते दि ६ मे २०२५ या कालावधी मध्ये संपन्न झालेल्या ब्लॅक बेल्ट परीक्षा आणि कॅम्प मध्ये सुमारे ४५ मुला – मुलींनी सहभाग घेतला.या ब्लॅक बेल्ट परीक्षेत अपेक्षा भगत हिने प्रथम क्रमांक मिळवून तिला बेल्ट, सर्टिफिकेट, ट्रॉफी, नॉन चाकू, आणि २ हजार रुपये किमतीचा कराटे ड्रेस बक्षीस देण्यात आला तर हार्दिक गेहलोत आणि कोळपेवाडी येथील अनुराग गवळी यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. साईशा जोरी तृतीय , कल्याणी शिंगाडे कोळपेवाडी चतुर्थ, शिवराज नरोडे पाचवा क्रमांक तर भरवी थोरात आणि सार्थक पंडोरे यांनी संयुक्तपणे सहावा क्रमांक मिळवला. अद्विक गिरमे, याने पण चांगले मार्क मिळवून ब्लॅक बेल्ट पदवी मिळवली.हर्ष लंगोटे याने ब्लॅक बेल्ट सेकंड दान डिग्री मिळवली. रिफ्री परीक्षेत शिवराज नरोडे याने प्रथम क्रमांक मिळविला, सार्थक पंडोरे याने द्वितीय, भरवी थोरात हिने तृतीय, अद्विक गिरमे याने चौथ क्रमांक, तर कल्याणी शिंगाडे हिने पाचवा क्रमांक मिळवला.

यशस्वी सर्व विद्यार्थ्यांना वर्षा देठे आणि पुष्कर बागडे सर यांनी प्रशिक्षण दिले.तर आशुतोष भोसले, तनुजा शिलेदार, सप्तमी डहारे, पूर्वा घाटे, आदर्श भगत, श्रवण शिंदे, हर्ष धनवटे, सरस ठोळे, साहिल पगारे यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले.
शालेय शासकीय कराटे आणि तायक्वांडो या खेळात जिल्हा, विभाग आणि राज्य स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करत या वर्षी नुकत्याच लागलेल्या इयत्ता १२ वी बोर्ड परीक्षेत खेळासाठी १० वाढीव गुण मिळविल्याबद्दल पुष्कर बागडे, श्रावणी गाडे आणि आदित्य मोहिते यांचाही याप्रसंगी सत्कार करण्यात आला.

तसेच कॅम्प मध्ये सहभाग घेत उत्कृष्ट सराव करत प्रथम क्रमांक श्रेयस पवार आणि हर्ष धनवटे यांनी घेतला..द्वितीय क्रमांक सर्वेश शेलार आणि श्रवण शिंदे यांनी घेतला..तृतीय क्रमांकावर अनन्या पुणेकर आणि धनश्री सोनवणे हे आले..मृण्मय मंडलिक आणि आदर्श भगत यांनी चौथा क्रमांक मिळवला.. परीक्षेत सहभागही सर्वात छोटी मुलगी काव्या मुरडे हिने ५ वा क्रमांक मिळवला, ओजस्विनी नरोडे हिने ६ वा क्रमांक मिळवला. तर वेदांत पाठक, शिवकन्या घोरपडे यांनीही चांगली प्रॅक्टिस करत कॅम्प मध्ये सहभाग घेत सर्टिफिकेट आणि ट्रॉफी जिंकली.

बक्षीस वितरण रेनबो इंटरनेशनल स्कूल पॉवर्ड बाय चैतन्य स्कूलच्या प्राचार्या विद्या विश्वनाथन यांच्या प्रमुख उपस्थित तर रवींद्र लंगोटे आणि योगिता रवींद्र लंगोटे यांच्या शुभ हस्ते पार पडले.. यशस्वी विद्यार्थ्यांना बेल्ट वितरण संस्थेचे प्रमुख प्रशिक्षक प्रा. सुदर्शन पांढरे यांच्या हस्ते देण्यात आले. यशस्वी सर्व विद्यार्थ्यांची कोपरगाव तालुक्यातील सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.



