जनतेचा विश्वास सार्थ ठरविण्याचे काम महायुती सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निश्चित करतील- ना.राधाकृष्ण विखे पाटील
जनतेचा विश्वास सार्थ ठरविण्याचे काम महायुती सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निश्चित करतील- ना.राधाकृष्ण विखे पाटील
मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न
लोणी विजय कापसे दि ५ डिसेंबर २०२४– राज्यातील जनतेने मोठ्या विश्वासाने महायुतीला जनाधार दिला आहे. जनतेचा विश्वास सार्थ ठरविण्याचे काम महायुती सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निश्चित करतील. यापुर्वी मुख्यमंत्री पदाची यशस्वी कारकीर्द जनतेने अनुभवली आहे. उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या अनुभवातून राज्याचे भविष्य अधिक उज्वल होईल असा विश्वास ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.
राज्याचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर ना.विखे पाटील यांनी तिघांचेही अभिनंदन करुन त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. राज्यातील जनतेने मागील अडीच वर्षांचा महायुती सरकारच्या निर्णयावर विश्वास ठेवून नुकत्याच संपन्न झालेल्या विधानसभा निवडणूकीत महायुतीला पाठबळ दिले आहे. राज्याच्या इतिहासामध्ये एवढे मोठे बहुमत महायुतीला प्राप्त झाले, याचे कारण फक्त महायुती सरकारने योजनांची केलेली यशस्वी अंमलबजावणी हेच आहे.
राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडाणवीस आणि दोन्हीही उपमुख्यमंत्र्यांचा झालेला शपथविधी हा राज्याच्या दृष्टीने एैतिहासिक दिवस असून, या राज्याला पुढे घेवून जाण्यासाठी या तिघांचाही अनुभव उपयुक्त ठरेल असा विश्वास व्यक्त करतानाच मागील अडीच वर्षात महायुती सरकारने ज्या योजना समाज घटकांसाठी सुरु केल्या त्या पुढे घेवून जातानाच राज्यातील जनतेची अपेक्षापुर्ती करण्याचे काम निश्चित महायुती सरकारकडून होईल असा विश्वास ना.विखे पाटील यांनी व्यक्त केला.