कै.बाळासाहेब सिनगर यांचे शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य- ज्ञानदेव जामदार
कै.बाळासाहेब सिनगर यांचे शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य- ज्ञानदेव जामदार
कै.बाळासाहेब सिनगर यांना २० व्या पुण्यस्मरणानिमित्त मान्यवरांकडून आदरांजली
कोपरगाव विजय कापसे दि ९ डिसेंबर २०२४– रयत शिक्षण संस्थेचे सौ.सुशीलामाई शंकरराव काळे माध्यमिक विद्यालय भोजडेच्या जडणघडणीत अमूल्य योगदान असलेले कै. बाळासाहेब चांगदेव सिनगर (अण्णा) यांचे शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य असल्याचे प्रतिपादन गौतम सहकारी बँकेचे माजी व्हाईस चेअरमन ज्ञानदेव जामदार यांनी कै. आण्णा यांना आदरांजली वाहताना व्यक्त केले.
सोमवार दि ९ डिसेंबर रोजी स्व.कर्मवीर शंकरराव काळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले कोपरगाव पंचायत समितीचे माजी सभापती कै. बाळासाहेब चांगदेव सिनगर यांचा २० वा स्मृतिदिन गौतम सहकारी बँकेचे माजी व्हाईस चेअरमन ज्ञानदेव जामदार यांच्या अध्यक्षतेखाली तसेच प्रसिद्ध समुपदेशक, मानसोपचारतज्ञ एस.एस. जी.एम महाविद्यालयाचे मानसशास्त्र विभागाचे प्रा. गोरक्ष नरोटे, स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष भाऊसाहेब सिनगर, प्रकाश गायकवाड, नानासाहेब सिनगर, संजय सिनगर, दिलीप सिनगर, संतोष सिनगर, अजित सिनगर, शहाराम सिनगर आदींच्या प्रमुख उपस्थितीत सौ.सुशीलामाई शंकराव काळे माध्यमिक विद्यालय भोजडे येथे संपन्न झाला.
या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक काशिनाथ लव्हाटे यांनी उपस्थित प्रमुख मान्यवरांचा परिचय करून देत, रयत शिक्षण संस्थेचे सौ. सुशिलामाई शंकरराव काळे माध्यमिक विद्यालयाच्या उभारणीसह जडणघडणीत मोलाचे योगदान असलेल्या आण्णांच्या अथांग कार्याबद्दलची महती उपस्थितांना सांगत सध्या विद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाची माहिती देत आण्णांना २० व्या पुण्यस्मरणानिमित्त अभिवादन केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा नरोटे यांनी विद्यार्थ्यांना शालेय जीवनात ताणतणावापासून दूर राहत फक्त आपल्या अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करत आपले ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करत कठोर अभ्यासाचा गुरु मंत्र देत सर्वांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या तर आण्णांना अभिवादन केले. तर शालेय विद्यार्थिनी विद्यार्थीनी श्रद्धा जाधव व तनुजा जेऊघाले यांनी देखील आपल्या भाषणातून आण्णांच्या कार्याची माहिती उपस्थितांना सांगत आण्णांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षपदाची सूचना शालेय शिक्षिका योगिता सुराळकर यांनी मांडली तर त्यास कमल साबळे यांनी अनुमोदन दिले. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शालेय शिक्षक भागवत माळोदे यांनी तर आभार दत्तू शिंदे यांनी व्यक्त केले. तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी, तबस्सुम शेख, काजल गायकवाड, महारु चव्हाण, गोविंद गोरे, रफिक सय्यद, पंडित सिनगर, शिवाजी धट आदी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले तर उपस्थित मान्यवर, विद्यार्थी व ग्रामस्थांनी आण्णांच्या स्मृतीस्थळी पुष्पगुच्छ वाहत अभिवादन केले.