संगमनेर
बांगलादेश मधील हिंदूंच्या रक्षणाकरता तातडीने उपाययोजना करा; आमदार सत्यजित तांबे यांची मुख्यमंत्री ना.फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे मागणी
बांगलादेश मधील हिंदूंच्या रक्षणाकरता तातडीने उपाययोजना करा; आमदार सत्यजित तांबे यांची मुख्यमंत्री ना.फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे मागणी
संगमनेर विजय कापसे दि ९ डिसेंबर २०२४– बांगलादेश मधील हिंदू धर्मियांचे अध्यात्मिक गुरु चिन्मय कृष्णदास यांना बांगलादेश सरकारने अत्यंत अन्यायकारक पद्धतीने अटक केली आहे. त्याचबरोबर तेथील अल्पसंख्यांक असलेला हिंदू धर्मियांवर सातत्याने विविध हल्ले होत असून यामुळे बांगलादेश मधील हिंदू सह संपूर्ण जगभरातील हिंदू धर्मीय चिंतेत आहे. तरी आपण तातडीने राजनैतिक हस्तक्षेप करून चिन्मय कृष्णदास यांच्या सुटकेबरोबर बांगलादेश मधील हिंदू धर्मियांना संरक्षण मिळण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.