विद्यार्थ्यांना बालहक्क संरक्षण, पोक्सो कायद्याचे ज्ञान आवश्यक- अॅड. सृष्टी कोपरे
विद्यार्थ्यांना बालहक्क संरक्षण, पोक्सो कायद्याचे ज्ञान आवश्यक- अॅड. सृष्टी कोपरे
विद्यार्थ्यांना बालहक्क संरक्षण, पोक्सो कायद्याचे ज्ञान आवश्यक- अॅड. सृष्टी कोपरे
कोपरगाव विजय कापसे दि १२ डिसेंबर २०२४-
न्यु इंग्लिश स्कूल व लक्ष्मणराव धनवटे कनिष्ठ महाविद्यालय पुणतांबा येथे बालहक्क संरक्षण कायदा व पोक्सो कायदा या संबंधी गुन्हे गंभिरता या बाबत विद्यार्थ्यांना पोक्सो कायद्याचे ज्ञान असणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन अॅड. सृष्टी राज कोपरे यांनी केले.
गुरुकूल प्रकल्प अंतर्गत बालहक्कसंरक्षण कायदा, गुन्हे व शिक्षा या विषयावर बाह्य तज्ञ मार्गदर्शक म्हणून अॅड. सृष्टी राज कोपरे बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनहित सामाजिक संस्थेचे संस्थापक संजय जोगदंड होते.
अॅड. सृष्टी कोपरे पुढे म्हणाल्या, पोस्को कायदा कधी लागू होतो? २०१२ साली अॅडीशनल पोस्को कायद्याचे महत्व व बालकांवर होणारे लैंगिक शोषण अत्याचार व त्यावर चालणारे खटले, प्रक्रिया या विषयी मार्गदर्शन केले.
या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक कडनोर यांनी प्रास्तविक भाषणात गुरुकूल प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली व प्रमुख पाहुण्यांचा यथोचित सत्कार केला. विद्यालयातील प्राध्यापक महेश घुले यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करुन दिला.
या कार्यक्रमाकरिता पर्यवेक्षक सुधाकर बनकर , डॉ. राज कोपरे, प्रा. महेश घुले, प्रा. अरुण मोरे, प्रा.ज्योती लामखेडे, प्रा. केकाण, प्रा. धनलाल ठाकरे, प्रा.भोसले, प्रा. वेताळ, सौ. रूपाली घुले शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते. शेवटी प्रा. उत्तम कुताळ यांनी उपस्थितांचे आभार मानले.
गुरुकूल प्रकल्प अंतर्गत बालहक्कसंरक्षण कायदा, गुन्हे व शिक्षा या विषयावर बोलतांना अॅड. सृष्टी राज कोपरे, समवेत प्राचार्य अशोक कडणोर, संजय जोगदंड, डॉ.राज कोपरे, प्रा. महेश घुले आदि उपस्थित होते.