शेतकऱ्यांच्या व समस्त साई भक्तांच्या कृपेने आजपासून फुलं हार विक्री सुरू: डॉ. सुजय विखे पाटील
शेतकऱ्यांच्या व समस्त साई भक्तांच्या कृपेने आजपासून फुलं हार विक्री सुरू: डॉ. सुजय विखे पाटील
शेतकऱ्यांच्या व समस्त साई भक्तांच्या कृपेने आजपासून फुलं हार विक्री सुरू: डॉ. सुजय विखे पाटील
शिर्डी विजय कापसे दि १२ डिसेंबर २०२४– उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आजपासून शिर्डी नगरीत हार फुले व प्रसादाची विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. राहाता तालुका आणि परिसरातील शेतकऱ्यांनी अनेक वर्षांपासून फुले विक्री सुरू करण्यासाठी संघर्ष केला होता. अनेक शेतकऱ्यांचे जीवनमान हे फुल शेतीवर अवलंबून होते आणि साई मंदिरात फुल- हार विक्रीस बंदी घालण्यात आल्यामुळे मोठा तोटा हा सर्वच शेतकऱ्यांना सहन करावा लागत होता. त्यामुळे शेतकऱ्यांना समाधानकारक असा निर्णय घेण्यात आल्याने शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे.
दरम्यान श्री क्षेत्र शिर्डी येथील साईबाबा मंदीरात आजपासून हार, फुले आणि प्रसाद विक्री करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार परवानगी देण्यात आली असून आज या विक्री स्टॉल्सचे उद्घाटन डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.
कोरोना संकट कालावधीपासून शिर्डी साई मंदिरात हार फुले घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली होती. परंतु आता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, साई संस्थेची समिती आणि मंदिरातील नियमावलीनुसार परवानगी मिळाल्याने शेतकरी व समस्त साई भक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे देश व जगभरातील साई भक्तांची आस्था होती की, फुलं व हार हे साई समाधी पर्यंत गेले पाहिजेत, ही आस्था आणि श्रद्धा आता पूर्णत्वास आल्याने साई भक्तांमध्ये देखील आनंदाचे वातावरण आहे, अशी माहिती डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.