कोपरगावात बेसबॉल खेळाडू आणि प्रशिक्षकांचे निवड शिबिर संपन्न
![](https://omsai24news.in/wp-content/uploads/2024/12/1002330831-780x455.jpg)
भारतात बेसबॉलचे खेळाडु घडवण्यासाठी खुप छान वातावरण आहे- कनवल सरा
![](https://omsai24news.in/wp-content/uploads/2024/12/1002315054.jpg)
कोपरगाव विजय कापसे दि १५ डिसेंबर २०२४– एमबीए प्लेयर्स व कोचेस क्लिनिक कॅम्प, आंतर राष्ट्रीय पातळीवरील व्यावसायिक स्पर्धेसाठी खेळाडू आणि प्रशिक्षकांची निवड शिबिर संपन्न होऊन संजीवनी इंजिनिअरिंग काॅलेज,संजीवनी विद्यापीठ कोपरगांव येथे महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशन च्या मान्यतेने अहिल्यानगर जिल्हा बेसबॉल असोसिएशन व संजीवनी विदयापीठ कोपरगांव यांच्या संयुक्त विदयमाने प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते.
![](https://omsai24news.in/wp-content/uploads/2024/12/1002252371.jpg)
या प्रशिक्षण शिबिराचे समारोप प्रसंगी खेळाडूना डायमंड ड्रीम अॕकेडमी चे सीईओ कनवल सरा यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करतांना म्हणाले की, महाराष्ट्र बेसबॉल असो व डायमंड ड्रीम अॕकेडमी च्या माध्यमातुन येथे बेसबॉल खेळाचा प्रसार व प्रचार करायचा आहे. चांगले खेळाडु तयार करायचे आहे.त्या साठी चांगले वातावरण आहे.लवकरच या बाबतीत स्पर्धेचे कॅलेंडर तयार करु व त्या प्रमाणे शिबिर व स्पर्धा आयोजित करु असे ते म्हणाले खेळाडू आणि प्रशिक्षकांसाठी शिबिरा करीता विलियम ख्राईस्ट फ्रान्सिस्कस जूनियर,डायरेक्टर डायमंड ड्रीम्स अकादमी, यूएसए. हे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहत होते.
![](https://omsai24news.in/wp-content/uploads/2024/07/IMG_20230511_101548.jpg)
![](https://omsai24news.in/wp-content/uploads/2024/12/1002330831.jpg)
११ डिसेंबर ते १४ डिसेंबर अखेर झालेल्या प्रशिक्षणात महाराष्ट्र तुन १२० खेळाडु सहभागी झाले होते.खेळाडु मधुन मुले व मुली बेस्ट पिचर, कॅचर,हीटर,तसेच उगवता खेळाडु अशी निवड करण्यात आली.व त्यांना बक्षिस स्वरूपात ट्रॉफीज देण्यात आल्या. हे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यासाठी डायमंड ड्रीम अकॅडमी चे सीईओ.कवल सरा संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त अमित कोल्हे ,महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशन चे सचिव राजेंद्र इखणकर, अशोक सरोदे,इंद्रजित नितीनवार यांचे मार्गदर्शन व सहकार्य मिळाले.या शिबिराचे संयोजन अहिल्यानगर बेसबॉल असोसिएशन चे अध्यक्ष अरुण चंद्रे सचिव मकरंद कोऱ्हाळकर यांनी केले.प्रशिक्षण यशस्वी होण्यासाठी विरुपाक्ष रेड्डी, कल्पेश भागवत, शिवराज पाळणे,अक्षय येवले,कन्हैया गंगुले,सोहम को-हाळकर आदिनी प्रयत्न केले.
![](https://omsai24news.in/wp-content/uploads/2024/12/1002323304.jpg)
![](https://omsai24news.in/wp-content/uploads/2024/12/1002323302.jpg)