लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे यांचे नेतृत्व संघर्षातून निर्माण झाले होते- मा.ना.राधाकृष्ण विखे पाटील
लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे यांचे नेतृत्व संघर्षातून निर्माण झाले होते- मा.ना.राधाकृष्ण विखे पाटील
लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे यांचे नेतृत्व संघर्षातून निर्माण झाले होते- मा.ना.राधाकृष्ण विखे पाटील
लोणी विजय कापसे दि १२ डिसेंबर २०२४– लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे यांचे नेतृत्व संघर्षातून निर्माण झाले होते. समाजातील नाहीरे वर्गाचा आवाज त्यांनी बुलंद केला होता. भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेशी समाजातील प्रत्येक घटकाला जोडून घेण्याचे महत्वपूर्ण काम त्यांनी आपल्या संपूर्ण राजकीय वाटचालीत केले असे प्रतिपादन मा.ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती दिना निमित्त प्रवरा उद्योग समुहाच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले. ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या निवासस्थानी स्व.मुंडे यांच्या प्रतिमेचे पुजन करुन अभिवादन केले. पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरही अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
स्व.गोपीनाथ मुंडे यांचे नेतृत्व लोकाभिमुख होते. विखे पाटील परिराशी त्यांचा ऋणानूबंध हा राजकारणा पलिकडचा होता. पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील आणि स्व.गोपीनाथ मुंडे यांची मैत्री सर्वश्रृत होती. अनेक सामाजिक प्रश्नांवर त्यांनी केलेल्या संघर्षाला यश मिळाले अशी आठवन सांगुन ना.विखे पाटील म्हणाले की, राज्यात युती सरकार असताना. स्व.मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळाली. जिल्ह्यातील अनेक प्रकल्पांना त्यांनी मदत केली. ही कामे पुर्ण करण्यासाठी निधीही उपलब्ध करुन दिल्याचे त्यांनी सांगितले.
सामाजिक प्रश्नांना न्याय देण्याच्या भूमिकेतून त्यांनी रस्त्यावरच्या संघर्षा बरोबरच विधानसभेत आणि लोकसभेत बजावलेली भूमिका ही महत्वपूर्ण ठरली. भारतीय जनता पक्षाला जनाधार मिळवूनदेण्यासाठी त्यांचे योगदान मोलाचे राहीले. सामान्य कार्यकर्त्याला सत्तेपर्यंत पोहोचविण्याची भूमिका घेवून समाजातील वंचित घटकाला न्याय कसा मिळेल यासाठीच त्यांनी अखेरपर्यंत काम केले असल्याचे ना.विखे पाटील म्हणाले.
पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सारख कारखाना कार्यस्थळावरही स्व.गोपीनाथ मुंडे यांना अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या प्रसंगी कारखान्याचे चेअरमन कैलास तांबे, व्हा.चेअरमन सतिष ससाणे यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते.