भंडारदरा धरणातून पिण्याच्या पाण्याच्या आवर्तनासह सिंचनाचेही आवर्तन – ना.विखे पाटील
भंडारदरा धरणातून पिण्याच्या पाण्याच्या आवर्तनासह सिंचनाचेही आवर्तन – ना.विखे पाटील
भंडारदरा धरणातून पिण्याच्या पाण्याच्या आवर्तनासह सिंचनाचेही आवर्तन – ना.विखे पाटील
शिर्डी विजय कापसे दि २३ डिसेंबर २०२४– भंडारदरा धरणातून पिण्याच्या पाण्याचे आवर्तन शनिवार दि.२१ डिसेंबर पासून सुरू करण्यात आले आहे. हेच आवर्तन सिंचनासाठीही सलग सुरु ठेवण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी विभागाच्या अधिकाऱ्याना दिल्या आहेत.
लाभक्षेत्रातील गावातील पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन शनिवार पासून सुरु करण्यात आले होते. मात्र लाभक्षेत्रातील शेतक-यांचीही पाण्याची गरज लक्षात घेवून सिंचनासाठीचे आवर्तन सुरु असलेल्या आवर्तनातूनच सलग सुरु ठेवण्याबाबत मंत्री विखे पाटील यांनी विभागाच्या आधिका-यांशी चर्चा करुन निर्णय घेतला. यामुळे लाभक्षेत्रातील शेतक-यांनाही दिलासा मिळणार आहे.
पिण्याच्या पाण्यासह सिंचनासाठीचे आवर्तन सलग सुरु राहणार असल्यामुळे विभागाच्या आधिका-यांनीही लाभक्षेत्रातील शेतक-यांना पाणी मिळेल याची काळजी घेण्याच्या तसेच पाण्याचा अपव्यय होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सुचना मंत्र्यांनी दिल्या आहेत.