आज सुजय विखे आहे तो फक्त आईच्या त्यागामुळे- डाॅ सुजय विखे पाटील
आज सुजय विखे आहे तो फक्त आईच्या त्यागामुळे- डाॅ सुजय विखे पाटील
आज सुजय विखे आहे तो फक्त आईच्या त्यागामुळे- डाॅ सुजय विखे पाटील
लोणी विजय कापसे दि जानेवारी २०२५- जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर अहंकारला बाजूला ठेवा आणि अपमान सहन करायला शिका. आज सुजय विखे आहे तो फक्त आईच्या त्यागामुळे आहे. राजकीय घराण्याची ओळख बाजूला ठेवून होस्टेलला शिक्षण घेवून मिळालेली ओळख मला महत्वपूर्ण वाटत असल्याचे मत डाॅ सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले.
२४ व्या पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील व्याख्यानमालेची सुरूवात डाॅ विखे यांच्या व्याख्यानाने झाली.माझी जडण घडण या विषयावर त्यांनी महाविद्यालयातील युवक युवतीशी दिलखुलास संवाद साधला. महाविद्यालयीन जीवनापासून ते लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवापर्यतच्या सर्वच गोष्टीवर भाष्य करून विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यामध्ये मिळालेल्या विजयानंतर झालेला आनंदही बोलून दाखवला.
बारावी नंतर काय करायचे याबबात माझे काही निश्चित ठरलेले नव्हते.पण वडीलांनी वैद्यकीय शिक्षणाला प्रवेश घ्यायला सांगितला.इंदोरच्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला.पण शिक्षण घेत असताना मी कोणा मंत्र्याचा मुलगा आहे किंवा खासदारांचा नातू आहे हे कळू दिले नाही.कारण आईने यासाठी मला शिक्षणासाठी दूर ठेवले.तिचा यासाठी असलेला त्याग तिने माझ्या यशासाठी केलेली धडपड मी कधीच विसरू शकत नाही असे सांगून डाॅ विखे म्हणाले की आयुष्यात आई वडीलांचा शब्दच प्रमाण माना.मी कधीही माझ्या आई वडीलांचा शब्द खाली पडू देत नाही.शेवटी सुखात आणि दुखात तेच आपल्या सोबत असतात त्यांच्याशी कधी प्रतारणा करू नका.तुम्हाला शिक्षणासाठी सर्व सोयी सुविधा देताना त्यांचा त्याग किती मोठा असतो याचा कधी तरी विचार करा असा सल्ला त्यांनी दिला.
आपल्या साध्या राहाणीचे कारण सांगताना डाॅ सुजय विखे यांनी अतिशय भावनिकतेन एका सामान्य रुग्णाला तपासण्याची वेळ आली तेव्हाच प्रसंग विषद केला.डाॅक्टर होवून सेवा देण्यासाठी पीएमटी मध्ये रुजू झालो तेव्हा एका अतिशय गरीब कुटूबातील मुलगा वडीलांना घेवून तपासणीसाठी आला पैसे नाहीत म्हणून रडू लागला तो प्रसंग ह्रदया मध्ये भिडला तेव्हा पासून मी साध्या राहणी मानाचा निर्णय घेतला.तोपर्यत मी घड्याळ गाड्या सर्व वापरत होतो.आजोबांच्या साध्या राहाणीचा सुध्दा माझ्यावर परीणाम झाल्याचे त्यांनी सांगितले.
कुटूबात राजकीय कार्यकर्त्यात मित्र मैत्रिणीत भांडण होत असतात पण त्याला नात्यात किती स्थान द्यायचे हे सुध्दा ठरवले पाहीजे.कारण अहंकराला फार जवळ करून कोणी मोठ होत नाही आणि अपमान सहन करण्याची ताकद तुमच्यात असेल तर यश सुध्दा फार दूर नसते असे स्पष्ट करून लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर मी काही दिवसात कामाला सुरूवात केली.नैराश्येच्या वावरणात राहीलो असतो तर काहीच घडले नसते.अनेकांनी टिका करून मला अपमानीत करण्याचा प्रयत्न झाला पण मी माझी भूमिका सोडली नाही.विधानसभा निवडणुकीत झालेल्या विजयानंतर झालेला नावलौकीक अपमान पुसून टाकण्यास कारणीभूत ठरल्याचे डाॅ विखे म्हणाले.
यावेळी युवक युवतींनी विचारलेल्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरे देत सामुदायिक विवाह करा.आपल्या कुंटूंबात संवाद ठेवा.जीवनात जीवनात कोणत्याही प्रकारचे नैष्या आले तरी स्वतःवर विश्वास ठेवायला शिका. संदेशही असा संदेशही त्यांनी दिलां.
प्रारंभी संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुष्मिता विखे पाटील यांनी व्याख्यानमालेचा उद्देश विशेष करत ही आगळी वेगळी व्याख्यानमाला व्हावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे असे सांगतानाच या व्याख्यानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांबरोबरच सर्वांचे जीवन सुखकर करण्याचा प्रयत्न व्याख्यानमालेचा असणार आहेत. यावेळी संस्थेचे शिक्षण संचालक डॉ. प्रदीप दिघे, कॅम्पस संचालक आर ए.डॉ. आर. ए . पवार यांच्यासह विद्यार्थी पालक आणि युवक युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शांताराम चौधरी यांनी तर आभार डॉ. आर. ए . पवार यांनी मांडले.