कोपरगाव विजय कापसे दि २९ जुन २०२५: शिक्षण महर्षी ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी स्थापन केलेल्या समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करताना त्यांच्यामध्ये लोकशाही मूल्यांची रुजवणूक करण्यावर भर दिला जातो. याच पार्श्वभूमीवर शाळेमध्ये पारदर्शक निवडणूक प्रक्रियेतून निवडून आलेल्या विद्यार्थ्यांचा शपथविधी व पदग्रहण सोहळा २८ जून २०२५ रोजी मोठ्या उत्साहात पार पडला.जाहिरात
या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने, कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक संदीप कोळी, शाळेचे संस्थापक काका कोयटे, सौ.सुहासिनी कोयटे, कार्यकारी विश्वस्त सौ. स्वाती कोयटे, तसेच पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी यावेळी सादर केलेले शिस्तबद्ध संचलन आणि जुन्या प्रतिनिधींनी आपली जबाबदारी नव्या प्रतिनिधींना हस्तांतरित करण्याचा कार्यक्रम पाहून पाहुणे भारावून गेले.जाहिरात
शाळेमध्ये ही निवडणूक प्रक्रिया सलग १३ व्या वर्षी राबवण्यात आली. यावेळी बोलताना प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना वाचनाकडे वळा, मोबाईलच्या आहारी न जाता स्वयंशिस्तीचे पालन करा असे मार्गदर्शन केले. त्यांनी सर्व नवनियुक्त प्रतिनिधींना नेतृत्वचिन्ह देऊन त्यांचा सन्मान केला.जाहिरात
प्राचार्य समीर अत्तार यांनी सर्व प्रतिनिधींना जबाबदारीची शपथ दिली. यावर्षी निवडणुकांमध्ये तीर्थ समदाडिया यांची स्कूल कॅप्टन म्हणून, समर राजपूत (हेड बॉय), एंजल भोई (हेड गर्ल), ईशान कोयटे (सहाय्यक हेड बॉय), ज्ञानेश्वरी मोरे (सहाय्यक हेड गर्ल) अशी निवड झाली. प्राथमिक विभागात राजस देशमुख, पहेल भंडारी, स्वरा लुटे, कौस्तुभ शेळके यांची निवड झाली.जाहिरात गौतम
याशिवाय रणवीर मांजरे, स्वस्ती ठोळे, कृती पहाडे, निधी जगताप, श्लोक उगले, दृष्टी लोकचंदानी, श्रीनिवास मोरे, क्रिया पोरवाल, आर्या जैन, शौर्य पटणी, अखिलेश अनभुले, यशवंत चव्हाण, मोक्षा अब्बड, नमन बडजाते, सिद्धी कोळी, मोहन लोंढे, सिद्धेश ठोंबरे, रुद्र राठोड, सान्वी सहाने, नुमेर खान यांचाही शपथविधी पार पडला.
कार्यकारी विश्वस्त स्वाती कोयटे यांनी आपल्या भाषणात “स्पर्धात्मक युगात सहभाग महत्वाचा असून नेतृत्व, जबाबदारी आणि कर्तव्य याची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणे अत्यावश्यक आहे,” असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दीक्षा गंगवाल, पार्थ होनकळस, आयेशा सय्यद, श्रेयश्री पाटील यांनी केले, तर इसाक पठाण यांनी आभार मानले. क्रीडा विभाग आणि सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समन्वयाने कार्यक्रम अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला. नवनिर्वाचित प्रतिनिधींनी शाळेच्या प्रगतीसाठी योगदान देण्याचा निर्धार व्यक्त करत कार्यक्रमाची सांगता झाली.