आपला जिल्हा
शिरसगाव सावळगाव शाळेचा बाल आनंद मेळावा जल्लोषात संपन्न
शिरसगाव सावळगाव शाळेचा बाल आनंद मेळावा जल्लोषात संपन्न
शिरसगाव सावळगाव शाळेचा बाल आनंद मेळावा जल्लोषात संपन्न
कोपरगाव विजय कापसे दि १२ जानेवारी २०२५–कोपरगाव तालुक्यातील पूर्व भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरसगाव मराठी, उर्दू ,जाधव वस्ती व सावळगाव या सर्व शाळेच्या संयुक्त रित्या शिरसगाव येथे बाल आनंद मेळावा शनिवार दि ११ जानेवारी मोठया जल्लोषात साजरा झाला.
माजी सरपंच सलीमबाबा पटेल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कैलास शेठ मढवे, इरफान पटेल ,सुलतान पटेल , रमेश गायकवाड, राहुल गायकवाड, भाऊराव भागवत , दत्तात्रय गायकवाड आदीसह ग्रामस्थ, शिक्षणप्रेमी नागरिक माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरवात सरस्वतीच्या प्रतिमा पुजनाने होऊन मुख्याध्यापक लांघे सर यांनी बालआनंद मेळाव्याचे महत्त्व सांगत पुस्तकी ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान सुद्धा आले पाहिजे यासाठी अशा उपक्रमाची गरज आहे. या कार्यक्रमात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मराठी उर्दू जाधव वस्ती व सावळगाव या चारही शाळेचे विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांनी विविध प्रकारचा भाजीपाला तसेच चहा नाश्ता इतर खाद्यपदार्थ विक्रीस उपलब्ध केले होते.