आपला जिल्हा
खोटा चेक दिल्याने कर्जदारास शिक्षा
खोटा चेक दिल्याने कर्जदारास शिक्षा
खोटा चेक दिल्याने कर्जदारास शिक्षा
कोपरगाव विजय कापसे दि १७ जानेवारी २०२५– कोपरगांव शहरातील ज्योती सहकारी पतसंस्थेच्या शिर्डी शाखेतुन कर्जदार यांनी घेतलेल्या कर्जाचे परतफेडीपोटी पतसंस्थेला दिलेला १० लाख रुपयेचा चेक न वटल्याने पतसंस्थेने त्यांचेवर रितसर कोपरगांव येथील न्यायालयात फौजदारी गुन्हा एस.सी.सी.नं.२५६/२०२० दाखल केला होता. त्यामध्ये चौकशीअंती आरोपी कर्जदार यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने कोपरगांव येथील न्यायाधिश श्रीमती स्मिता एम्. बनसोड यांनी आरोपीस ६ महिन्याची साध्या कैदेची शिक्षा ठोठावली. तसेच फिर्यादी ज्योती सहकारी पतसंस्थेस १० लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश केला, तसेच नुकसान भरपाईची रक्कम न दिल्यास आरोपीस पुन्हा ३ महिन्याची साध्या कैदेची शिक्षा सुनावली आहे. याकामी अॅडव्होकेट एस्.डी. काटकर यांनी कामकाज पाहिले.