आपला जिल्हा

वारीत टेके पाटील ट्रस्टकडून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा सन्मान 

वारीत टेके पाटील ट्रस्टकडून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा सन्मान 
वारीत टेके पाटील ट्रस्टकडून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा सन्मान 
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ३ एप्रिल २०२५ : तालुक्यातील वारी येथील राहुल दादा मधुकरराव टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त वारीतील ग्रामस्थांच्या सेवेसाठी तुटपुंज्या पगारातही आपण गावचे काहीतरी देणे लागतो. या भावनेतून अहोरात्र परिश्रम करून कार्यालयीन कामकाज, सार्वजनिक पाणीपुरवठा, स्वच्छता विभागात काम करून गावची सेवा करणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे ॠण व्यक्त करून सालाबादप्रमाणे अल्पोपहार, शाल व पुरुष कर्मचाऱ्यांना उन्हापासून संरक्षण व्हावे म्हणून डोक्यातील टोपी (कॅप) व महिला कर्मचाऱ्यांना स्टोल (स्कार्फ) देऊन छोटासा सन्मान केला. तसेच मोफत मदत सेवा केंद्राचे स्वयंसेवक तथा वारी पोस्ट कार्यालयाचे पोस्टमास्तर संजय कवडे यांचा देखील सन्मान करण्यात आला.

जाहिरात
    या प्रसंगी वारीचे प्रथम लोकनियुक्त सरपंच सतीशराव कानडे, ट्रस्टचे अध्यक्ष तथा ग्रा.पं. सदस्य पत्रकार रोहित टेके, ग्रा.प.सदस्य योगेश झाल्टे, विजय ठाकरे, मोफत मदत सेवा केंद्राचे स्वयंसेवक मदन काबरा, रवींद्र टेके, दिलीपराव पवार, जय ठाकरे उपस्थित होते.

जाहिरात
  यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी शेषराव रगडे, मच्छिंद्र गागरे, सतीश गायकवाड, चेतन वाळुंज, विलास जगधने, मनोज जगधने, पोपट बनकर, बागुल मावशी, नंदा महिरे, रावसाहेब वाघ, संदीप आगे यांचा सन्मान करण्यात आला.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे