चणेगावच्या श्री.रामेश्वर विद्यालयाचा माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात

चणेगावच्या श्री.रामेश्वर विद्यालयाचा माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात
चणेगावच्या श्री.रामेश्वर विद्यालयाचा माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात

संगमनेर विजय कापसे दि १३ फेब्रुवारी २०२५–तालुक्यातील चणेगाव येथील २००२-०३ या वर्षात दहावी उतीर्ण झालेल्या श्री.रामेश्वर विद्यालयाचा माजी विद्यार्थी मेळावा नुकताच उत्साहात पार पडला.तेवीस वर्षांनी एकत्र आलेल्या या सर्व माजी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर चैतन्य आणि समाधानाचे भाव प्रकटले.

आयर्लंड स्थित असलेले बापू जोशी तसेच भारतीय हवाई दलात सक्रीय असलेले प्रदिप पानसरे यांनी या स्नेहसंमेलन मेळाव्याचे आयोजन केले होते.येथील रामेश्वर मंदिराच्या प्रांगणात हा मेळावा पार पडला.

कौलाघात धकाधकीच्या जीवनात सर्व जण आपापल्या परीने विखुरलेले पण ऋणानुबंध कधीच तुटत नसतात यावेळी सर्वांनी एक दुसऱ्याला फोनाफोनी करून हा मेळावा नुकताच घडवून आणला.यावेळी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी उपस्थितांचा छोटेखानी सत्कार आयोजित करण्यात आला होता.सत्कार समारंभानंतर सर्वांनी एकत्रित स्नेहभोजन केले आणि या कार्यक्रमाची सांगता झाली.
