विखे-पाटील

श्रीरामपूर येथे जनसेवा फाऊंडेशनतर्फे भव्य हळदीकुंकू व “खेळ पैठणीचा, सन्मान महिलांचा” कार्यक्रमाचे आयोजन

श्रीरामपूर येथे जनसेवा फाऊंडेशनतर्फे भव्य हळदीकुंकू व “खेळ पैठणीचा, सन्मान महिलांचा” कार्यक्रमाचे आयोजन

श्रीरामपूर येथे जनसेवा फाऊंडेशनतर्फे भव्य हळदीकुंकू व “खेळ पैठणीचा, सन्मान महिलांचा” कार्यक्रमाचे आयोजन

जाहिरात आत्मा

श्रीरामपूर विजय कापसे दि २१ फेब्रुवारी २०२५: जनसेवा फाऊंडेशनच्या वतीने मकर संक्रांतीच्या निमित्ताने श्रीरामपूर तालुक्यातील महिलांसाठी भव्य हळदीकुंकू समारंभ आणि “खेळ पैठणीचा, सन्मान महिलांचा” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम उद्या, शनिवार दिनांक २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता थत्ते मैदान येथे संपन्न होणार आहे.

जाहिरात

या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी जय्यत तयारी पूर्ण झाली असून, तालुक्यातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे कार्याध्यक्ष  नितीन दिनकर, ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश चित्ते, तालुका अध्यक्ष दीपक अण्णा पटारे आणि इतर मान्यवरांनी केले आहे.

जाहिरात

कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील आणि रनरागीनी महिला मंडळाच्या अध्यक्षा  धनश्रीताई विखे पाटील यांची प्रमूख उपस्थिती असणार आहे

जाहिरात

महिलांसाठी आकर्षक बक्षिसे
या कार्यक्रमात सहभागी महिलांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले असून, विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. त्यामध्ये *एक तोळा सोन्याचे नेकलेस*, सोनी कंपनीचा एलईडी टीव्ही, सॅमसंग व व्हर्लपूल कंपनीचे फ्रीज, वॉशिंग मशीन, एअर कूलर, वॉटर प्युरिफायर, मिक्सर ग्राइंडर, ओव्हन, व्हॅक्यूम क्लीनर, गॅस स्टोव्ह, सारेगामा कारवा यांसह ५०० पैठणी साड्यांचा समावेश आहे.

या भव्य कार्यक्रमात तालुक्यातील व शहरातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजक आणि मान्यवरांनी केले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे