आपला जिल्हा
टेके पाटील ट्रस्टचा पुढाकारातून वारी गावात ‘मोफत पाणपोई’ ची सुरुवात
टेके पाटील ट्रस्टचा पुढाकारातून वारी गावात ‘मोफत पाणपोई’ ची सुरुवात

कोपरगाव विजय कापसे दि २२ फेब्रुवारी २०२५: तालुक्यातील वारी येथील राहुल (दादा) मधुकरराव टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता वाटसरुंसाठी शिवजयंतीच्या दिवशी रेल्वे गेट परिसरात ‘मोफत पाणपोई’ सुरू करण्यात आली आहे. या पाणपोईचे उद्घाटन प्रभाग क्रमांक चार येथील महिलांच्या हस्ते पूजन व फीत कापून करण्यात आले. या सामाजिक उपक्रमाचा उपस्थितांमध्ये पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला.







