सात नंबर पाणी मागणी अर्ज भरण्यास मुदत वाढ द्यावी -आ.आशुतोष काळे

सात नंबर पाणी मागणी अर्ज भरण्यास मुदत वाढ द्यावी -आ.आशुतोष काळे
सात नंबर पाणी मागणी अर्ज भरण्यास मुदत वाढ द्यावी -आ.आशुतोष काळे

कोपरगाव विजय कापसे दि ७ मार्च २०२५ – पाटबंधारे विभागाकडून गोदावरी डाव्या-उजव्या कालव्यांच्या अंतर्गत असलेल्या शेतकर्यांना सात नंबर पाणी मागणी अर्ज दि.६ मार्च २०२५ पर्यंत भरण्याचे आवाहन केले होते परंतु काही शेतकर्यांनी अद्यापपर्यंत शेतकऱ्यांनी आपले सात नंबर पाणी मागणी अर्ज भरलेले नाहीत त्यामुळे सात नंबर पाणी मागणी अर्ज भरण्यासाठी मुदत वाढवून द्या अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाला दिल्या आहेत.

आ.आशुतोष काळे यांनी म्हटले आहे की, गोदावरी कालव्याच्या लाभधारक क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी उन्हाळ हंगाम २०२४/२५ साठी उन्हाळी हंगामी पिके, बारमाही उभी पिके, चारा पिके, ऊस व फळबागा आदी पिकांसाठी पाटबंधारे विभागाकडून जाहीर प्रगटन प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतीसाठी सात नंबर पाणी मागणी अर्जावर पाणी देण्यात येणार आहे.त्यासाठी गोदावरी कालव्याच्या लाभधारक शेतकऱ्यांना सात नंबर पाणी मागणी अर्ज दाखल करण्यासाठी दि.६ मार्च २०२५ अखेर पर्यत मुदत देण्यात आली होती. सदरची मुदत संपली असून पाटबंधारे विभागाकडून देण्यात आलेल्या कालावधीत अनेक लाभधारक शेतकर्यांनी पाणी मागणीचे अर्ज वेळेत भरलेले नाहीत.

यामुळे अनेक शेतकरी आवर्तनापासून वंचित राहून त्यांचे नुकसान होणार आहे. उन्हाची वाढलेली तीव्रता पाहता लाभधारक सर्वच शेतकर्यांना शेतीसाठी आवर्तन मिळणे गरजेचे आहे. या बाबीचा पाटबंधारे विभागाने गांभीर्याने विचार करून सात नंबर पाणी मागणी अर्ज भरण्यासाठी १२ मार्च पर्यंत मुदत वाढ द्यावी अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागास दिल्या आहेत.
