कोपरगावात उत्सहात श्री रामदेवबाबा जयंती सोहळा साजरा
कोपरगावात उत्सहात श्री रामदेवबाबा जयंती सोहळा साजरा
जाहिरात
कोपरगाव विजय कापसे दि ६ सप्टेंबर २०२५– कोपरगाव शहरातील वाल्मिकी समाजाच्या वतीने युवा सेनेचे शहर प्रमुख पै.गगन हाडा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जय महाकाल मित्र मंडळ व संपूर्ण हाडा परिवार यांच्या सहकार्याने सोमवार दिनांक १ सप्टेंबर व मंगळवार दिनांक २ सप्टेंबर या पर्व काळात मोठा उत्सहात वाल्मिकी समाजाचे आराध्य दैवत श्री रामदेवजी बाबा जयंती सोहळा विविध धार्मिक कार्याने साजरा करण्यात आला.
जाहिरात
कोपरगाव शहरातील कोर्ट रोड येथील हाडा निवस्थानी संपन्न झालेल्या श्री रामदेवजी बाबा दशमी उत्सवानिमित्त सोमवार दिनांक १ सप्टेंबर रोजी जम्मा जागरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होऊन मंगळवारी सर्व भाविकांना महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी समता पतसंस्थेचे काका कोयटे, संजीवनी महिला बचत गटाच्या रेणुका कोल्हे, मोनिका संधान, शिवसेना ठाकरे गटाचे भरत मोरे, माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल, माजी नगरसेवक मंदार पहाडे, वीरेंन बोरावके, डॉ चंद्रशेखर आव्हाड, हाशम पटेल आदी मान्यवरांनी कार्यक्रमास भेटी दिल्या.जाहिरात
याप्रसंगी पै. गगन हाडा यांनी बोलताना सांगितले की, वाल्मिकी समाजाचे आराध्य दैवत श्री रामदेवजी महाराज जयंती उत्सवाला अनन्यसाधारण महत्व असून गेल्या अनेक वर्षापासून मोठ्या उत्साहात जयंती सोहळा साजरा केला जात असल्याचे सांगत सर्वांना शुभेच्छा दिल्या.