संगमनेर
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांना पुण्यतिथी निमित्त १४ मार्च रोजी अभिवादन
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांना पुण्यतिथी निमित्त १४ मार्च रोजी अभिवादन

संगमनेर विजय कापसे दि ११ मार्च २०२५– सहकारासाठी दीपस्तंभ असलेल्या अमृत उद्योग समूहाचे संस्थापक थोर स्वातंत्र्य सेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या 15 व्या पुण्यतिथीनिमित्त शुक्रवार दिनांक 14 मार्च 2025 रोजी सकाळी 9 वा.अमृतेश्वर मंदिराजवळील प्रेरणास्थळ येथे काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात व मा.आ.डॉ.सुधीर तांबे यांच्या उपस्थितीत अभिवादन व पुष्पांजली कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन बाबासाहेब ओहोळ यांनी दिली आहे.



