आपला जिल्हा

जमीनींचे वाद कायमस्‍वरुपी सोडविण्‍यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्‍व अभियान उपयुक्‍त ठरेल – शालिनीताई विखे पाटील

जमीनींचे वाद कायमस्‍वरुपी सोडविण्‍यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्‍व अभियान उपयुक्‍त ठरेल – शालिनीताई विखे पाटील

जमीनींचे वाद कायमस्‍वरुपी सोडविण्‍यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्‍व अभियान उपयुक्‍त ठरेल – शालिनीताई विखे पाटील

जाहिरात

Loni vijay kapse दि १० एप्रिल २०२६सामान्‍य माणसाला महसूल विभागाकडून आवश्‍यक असलेले दाखले आणि योजनांची माहीती मिळवून देण्‍याबरोबरच वर्षानुवर्षे ग्रामीण भागात सुरु असलेले जमीनींचे वाद कायमस्‍वरुपी सोडविण्‍यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्‍व अभियान उपयुक्‍त ठरेल असा विश्‍वास जिल्‍हा परिषदेच्‍या माजी अध्‍यक्षा  शालिनीताई विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केला.

जाहिरात

       महसूल विभागाच्‍या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्‍व अभियानाचा शुभारंभ लोणी बुद्रूक येथे करण्‍यात आला. माजी मंत्री आण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील यांच्‍या प्रमुख उपस्थितीत झालेल्‍या या कार्यक्रमास तहसिलदार अमोल मोरे, सरपंच कल्‍पना मैड, चेअरमन नंदकिशोर राठी, माजी सभापती बापूसाहेब आहरे, अनिल विखे, संजय आहेर, प्रविण विखे, बाजार समितीचे उपसभापती आण्‍णासाहेब कडू, भूमापण आधिकारी योगेश थोरात यांच्‍यासह ग्रामस्‍थ, पदाधिकारी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.

जाहिरात

आपल्‍या भाषणात सौ.शालिनीताई विखे पाटील म्‍हणाल्‍या की, अनेक वेळा महसूल विभागामध्‍ये शासकीय दाखल्‍यांसाठी चकरा माराव्‍या लागतात. मात्र आता शासनच लोकांच्‍या दारी या अभियानाच्‍या माध्‍यमातून येत आहे. पारदर्शी, गतीमान आणि लोकाभिमुख कारभाराचा प्रत्‍येय या अभियानातून मि‍ळेल. हा उपक्रम केवळ शासकीय नाही तर, समाज घटकांसाठी शासनाच्‍या सर्व सेवा सहज उपलब्‍ध करुन देण्‍याचा एक यशस्‍वी प्रयत्‍न असल्‍याचे तयांनी सांगितले.

जाहिरात

दैनंदिन कामामध्‍ये सर्वाधिक अर्ज हे जमीनींच्‍या वादाचे प्राप्‍त होता. वर्षानुवर्षे हे वाद महसूल विभागात किंवा न्‍यायालयात प्रलंबित राहीले आहेत. परंतू सामंजस्‍याने हे वाद मिटविण्‍यासाठी हे अभियान एक संधी असून, या माध्‍यमातून गावातील तंटे मिटविण्‍याबरोबरच शासकीय योजना तसेच दाखल्‍यांसाठी हे अभियान गावोगावी येवून आता नागरीकांना दिलासा देईल असा विश्‍वास त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

 माजी मंत्री आण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील यांनी या अभियानाच्‍या   उपक्रमाबद्दल महसूल विभागाचे अभिनंदन करुन, लोकांच्‍या हितासाठी शासन योजनांच्‍या अंमलबजावणीसाठी गावापर्यंत पोहोचत आहे. व्‍यक्तिगत लाभाच्‍या मोठ्या योजना शासन स्‍तरावर सुरु असतात माहीती अभावी योजनांचा लाभ मिळू शकत नाही. यासाठी महाराजस्‍व अभियान दिशादर्शक ठरेल. यापुर्वी महसूल मंत्री म्‍हणून काम करताना ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी महसूल पंधरवडा हा उपक्रम सुरु करुन, जनतेला दिलासा दिला होता.

या अभियानाच्‍या निमित्‍ताने कृषि क्षेत्रातील लाभार्थ्‍यांना ट्रॅक्‍टरचे वितरण तसेच महिलांना आणि विद्यार्थ्‍यांना प्रमाणपत्र वितरीत करण्‍यात आले. ड्रोन तंत्रज्ञानाचे प्रा त्‍यक्षिकही या निमि‍त्‍ताने ग्रामस्‍थांना देण्‍यात आले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे