एस एस जी एम कॉलेज

एस.एस.जी.एम. महाविद्यालयात ‘बौद्धिक संपदा हक्क’ विषयावर ऑनलाइन राज्यस्तरीय चर्चासत्र संपन्न

एस.एस.जी.एम. महाविद्यालयात ‘बौद्धिक संपदा हक्क’ विषयावर ऑनलाइन राज्यस्तरीय चर्चासत्र संपन्न

एस.एस.जी.एम. महाविद्यालयात ‘बौद्धिक संपदा हक्क’ विषयावर ऑनलाइन राज्यस्तरीय चर्चासत्र संपन्न

जाहिरात आत्मा

कोपरगाव विजय कापसे दि १३ मार्च २०२५श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स आणि संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव येथील Research Committee, IIC आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बौद्धिक संपदा हक्क’ या महत्त्वपूर्ण विषयावर राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन बुधवार, दि. १२ मार्च २०२५ रोजी करण्यात आले. या चर्चासत्रामध्ये पेटंट, पेटंट प्रोसेस, कॉपीराईट संकल्पना, ट्रेडमार्क, वाड्मयीन चौर्य यासारख्या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. सदर चर्चासत्रामध्ये विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ, प्राध्यापक, अभ्यासक, संशोधक आणि विद्यार्थी यांनी सहभाग घेतला.

जाहिरात

चर्चासत्राच्या सुरवातीच्या सत्रामध्ये पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड रिसर्च, पुणे येथील डॉ. राहुल बावणे यांनी, “पेटंट, पेटंटची प्रोसेस स्पष्ट करताना नवीन आयडिया, त्याचबरोबर समाज उपयोगी गोष्टींसाठी पेटंट मिळते हे सांगत असताना अनुवैश्विक ऊर्जा, अन्नप्रक्रिया, रेसिपी व ज्या गोष्टी मानवास हानिकारक आहे अशा गोष्टींसाठी पेटंट मिळत नाही” हे आवर्जून सांगितले. त्यांनी पेटंट मिळविण्याची प्रक्रिया, अविष्कार क्षेत्र ,शोधाची पार्श्वभूमी, पूर्वीची कला (prior arts), आविष्काराचा समारंभ (summary of invention) दावा (claim), समावेश (comprising) या गोष्टींवर लक्ष केंद्रित केले.

जाहिरात

संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय कोपरगाव येथील प्रा. वैभव सूर्यवंशी यांनी “बौद्धिक संपदा: पेटंट आणि ट्रेडमार्क” या विषयावर मार्गदर्शन करताना विविध क्षेत्रात मिळणाऱ्या पेटंट विषयी सविस्तर माहिती देऊन त्यांनी ट्रेडमार्क, कॉपीराईटची संकल्पना, संरक्षण कालावधी इ. गोष्टी स्पष्ट केल्या. त्याचबरोबर व्यापार रहस्य (Trade Secrets) ची संकल्पना सांगून उद्देश, कालावधी,उदाहरणासह स्पष्ट केली. आय.पी. (I.P.) या संकल्पनेची अंमलबजावणी सांगत असताना कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन, किंवा ट्रेडमार्क बनावट केल्यास कायद्यामध्ये असलेल्या तरतुदी स्पष्ट केल्या. थोडक्यात आय.पी. (I.P.) नाविन्य आणि सर्जनशीलता चालवते, चाचेगिरी आणि बनावटगिरी पासून व्यवसायांचे संरक्षण करते, निष्पक्ष स्पर्धा वाढवते यासाठी आयपी. (I.P.) च्या अंमलबजावणीसाठी जागतिक सहकार्य महत्त्वाचे आहे, असे स्पष्ट केले.

जाहिरात

पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड रिसर्च, पुणे येथील डॉ. साहिल एस. साळवी यांनी
कॉपीराइट: फाइलिंग आणि नोंदणी या विषयावर मार्गदर्शन करताना त्यांनी, “ बौद्धिक संपदा हक्क, वाड्मयीन चौर्य अनधिकृत वापरापासून संरक्षण, विश्वासाहर्ता आणि बाजारमूल्य या विषयी मार्गदर्शन केले. तसेच कॉपीराईट नोंदणीसाठी जबाबदार अधिकार,(D.P.I.I.T.), कायदेशीर कार्यवाही, सीमा शुल्क अंमलबजावणी आणि सविस्तरपणे कॉपीराईट फाईल करण्यासाठीची प्रक्रिया अभ्यासकांपुढे विस्तृत स्वरूपात मांडली.

जाहिरात

या चर्चासत्राचे प्रास्ताविक व उद्घाटनपर मनोगत प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी केले. त्यांनी आपल्या मनोगतात पाहुण्यांचे शब्दसुमनांनी स्वागत करून बौद्धिक संपदा हक्काचे महत्त्व व जतन या वर मार्गदर्शन केले. या चर्चासत्रासाठी विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉ. मोहन सांगळे, कला विभागाचे उपप्राचार्य डॉ. बाबासाहेब शेंडगे, वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य डॉ. अर्जुन भागवत, IQAC प्रमुख डॉ. निलेश मालपुरे, इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन सेलचे डॉ. नामदेव चव्हाण, Research Committeeचे चेअरमन डॉ. विलास गाडे, कार्यालयीन अधीक्षक  सुनील गोसावी यांचे सहकार्य लाभले. सदर चर्चासत्रासाठी महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व पदव्युत्तर वर्गाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. चर्चासत्राचा गोषवारा व मान्यवरांचे आभार डॉ. विलास गाडे यांनी मानले. या चर्चासत्राचे सूत्रसंचालन डॉ. वैशाली सुपेकर आणि डॉ. प्रतिभा रांधवणे यांनी केले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे