आपला जिल्हा

ब्राम्हणगावच्या शाळेत तासाला होते वॉटर बेल

ब्राम्हणगावच्या शाळेत तासाला होते वॉटर बेल
ब्राम्हणगावच्या शाळेत तासाला होते वॉटर बेल
जाहिरात कोल्हे

कोपरगाव विजय कापसे दि १८ मार्च २०२५दिवसेंदिवस उन्हाळा अत्यंत भयावह होत चालला असून याचे अनेक दुष्परिणाम संपूर्ण जीवसृष्टीला होत आहे यातुन महत्वाचे अति कडक व दमट उन्हामुळे लहान थोर मानवासह मुक्या प्राण्यांना उष्माघात होण्याचे प्रमाण मोठया प्रमाणात वाढले असून यात अनेकांना जीव देखील गमवावा लागला आहे.

जाहिरात
या कडक उन्हाळ्यात या उष्माघातापासुन शरीराला वाचण्यासाठी भरपुर प्रमाणात पाणी पाण्याची आवश्यकता असते परंतु शालेय विद्यार्थ्यांमध्ये खेळाच्या नादात  जास्तीत जास्त पाणी पिण्याचा अभाव सर्वत्र दिसून येतो म्हणून याच बाबीचा विचार करत शालेय विद्यार्थ्यांमध्ये हा त्रास टाळण्यासाठी आयुष्मान आरोग्य मंदिर ब्राम्हणगावचे समुदाय आरोग्य अधिकारी संकेत पोटे आणि ब्राम्हणगाव परिसरातील सर्व प्राथमिक,माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक यांच्या समन्वयाने दर एक तासाला  वॉटर बेल  ही संकल्पना राबविण्यास सुरुवात केली असुन या संकल्पनेनुसार शाळेच्या वेळेत प्रत्येक १ तासाला बेल (शाळेची घंटा ) देऊन विद्यार्थ्यांना पाणी पिण्यास सांगितले जाणार आहे जेणेकरून विद्यार्थ्यांच्या शरीरात  मुबलक प्रमाणात पाण्याची मात्रा असल्याने शरीर थंड होणार असून ज्यामुळे उन्हाचा त्रास विद्यार्थ्यांना जाणवणार नाही किंबहुना उष्माघात देखील होणार नाही.

जाहिरात
या अभिनव संकल्पना राबविणारे आयुष्मान आरोग्य मंदिर ब्राम्हणगावचे समुदाय आरोग्य अधिकारी संकेत पोटे यांचे सर्वत्र कौतुक होत असून सर्व शाळेमध्ये या उपक्रमाची सुरुवात होणे आवश्यक असल्याचे मत सर्वांनी व्यक्त केले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे