आपला जिल्हा

साईंच्या नगरीत संपन्न झाले मरणोत्तर नेत्रदान

साईंच्या नगरीत संपन्न झाले मरणोत्तर नेत्रदान
साईंच्या नगरीत संपन्न झाले मरणोत्तर नेत्रदान
जाहिरात कोल्हे

शिर्डी विजय कापसे दि २१ मार्च २०२५साईबाबा संस्थान ट्रस्टचे श्री साईनाथ रुग्णालय येथे नुकतीच आय बँक सुरू करण्यात आली असून या आय बँकेमध्ये गुरुवार दिनांक २० मार्च रोजी द्वारकामाई वृद्धाश्रम येथील शशीधर सिताराम बेकल वय वर्ष ६३ राहणार द्वारकामाई वृद्धाश्रम शिर्डी यांचे मरणोत्तर नेत्रदान संपन्न झाले.

जाहिरात आत्मा
 याकामी साईनाथ नेत्रपेढीचे ट्रान्सप्लांट कॉर्डिनेटर तसेच आय बँक मॅनेजर डॉ.अशोक गावित्रे साईनाथ रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका मैथिली पितांबरे, साईबाबा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ.शैलेश ओक,उपसंचालक प्रीतम वडगावे, मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ गाडीलकर यांचे मार्गदर्शन लाभले.

जाहिरात
 याप्रसंगी ऋषि कोते, श्रद्धा भुसावळ, सचिन घारे, अकबर मामा, डॉ.निघूते मॅडम, डॉ विखे मॅडम, डॉ. पाटिल सर आदींच मोलाचं सहकार्य लाभलं या नेत्रदानामुळे दोन अंध व्यक्तींच्या आयुष्यात नवीन प्रकाशाची पहाट होणार आहे या नेत्र पेढीमुळे अनेक अंध व्यक्तींच्या आयुष्यात प्रकाश फुलणार असून साईबाबांच्या हयातीत सुरू असलेले रुग्णसेवेचे काम शिर्डी मध्ये चालू असून या नेत्रपेढी मुळे अनेक अंध व्यक्तींच्या आयुष्यात प्रकाश  येणार असून हजारो अंध व्यक्तीना याचा फायदा होणार आहे. मरणोत्तर नेत्रदान करण्यासाठी ७९७२६७७७८१ या नंबर वर संपर्क करण्याचा आवाहन डॉ.अशोक गावित्रे यांनी केले आहे.

जाहिरात
जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे