आपला जिल्हा

ई केवायसी न केल्यास धान्य होणार बंद -जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बडे

ई केवायसी न केल्यास धान्य होणार बंद -जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बडे

ई केवायसी न केल्यास धान्य होणार बंद -जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बडे

जाहिरात आत्मा

कोपरगाव विजय कापसे दि २९ मार्च २०२५धान्य घेण्यास पात्र असलेल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची इ- के वाय सी तात्काळ करून घ्या अन्यथा धान्य बंद होणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बडे यांनी दिली आहे.

जाहिरात

राज्यातील ज्या कार्डधारकांना धान्य वितरित होत आहे अशा सर्व लाभार्थी कार्ड धारकांनी आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची ई -केवायसी करणे शासनाने बंधनकारक केले आहे. गेल्या चार महिन्यापासून ई – के वाय सी करण्याचे काम आपल्या गावातील रेशन दुकान येथे पॉस मशीनवर सुरू आहे. परंतु अजूनही अनेक लाभार्थ्यांची केवायसी करणे बाकी आहे. इ केवायसी करण्यासाठी शासनाकडून ॲप देण्यात आले असून त्याद्वारेही आपल्या मोबाईल मधूनच घर बसल्या किंवा आपण करू शकतो अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कोपरगाव येथील रेशन दुकानदार यांच्या आढावा बैठकीत दिली आहे. तालुक्यातील सर्व लाभार्थी रेशन कार्डधारकांनी रेशन दुकानावर जाऊन आपली केवायसी करून घ्यावी . ज्यांची केवायसी होणार नाही त्यांचे नाव रेशन कार्ड तून कमी होणार असून त्यांचे धान्यही बंद होणार आहे.तरी आपण सर्वांनी सोमवार दिनांक ३१ मार्च २०२५ पर्यंत कोणतेही कारण न सांगता ई केवायसी करावी असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी केले आहे.

जाहिरात

यावेळी पुरवठा अधिकारी सौ नेटके मॅडम, तालुका पुरवठा निरीक्षण अधिकारी अमोल फोफसे, पुरवठा निरीक्षक नितीन देशमुख यांचे सह रेशन दुकानदार संघटनेचे तालुका अध्यक्ष उत्तम चळवळ ,बाळासाहेब दवंगे ,फकीर टेके ,सागर नरोडे, रवींद्र पोळ ,किरण डांगे ,माऊली दराडे, अशोक लकारे, पांडुरंग नरोडे हिराबाई जावळे पत्रकार जनार्दन जगताप आदी सह दुकानदार बंधू उपस्थित होते.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे