आपला जिल्हा

गंगागिरी महाराजांच्या सप्ताहास पंचाळे येथे १० ऑगस्ट पासून शुभारंभ- पहिल्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती

गंगागिरी महाराजांच्या सप्ताहास पंचाळे येथे १० ऑगस्ट पासून शुभारंभ- पहिल्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती

पाऊस पाणी यापासून भाविकांचा बचाव व्हावा त्यांना महाप्रसादाचा आस्वाद घेता यावा म्हणून जेवणाचा मंडप तसेच निवासस्थानाचा मंडप २०० बाय ८० फुटाचा असून सोळा हजार स्क्वेअर फुट क्षेत्रफळ आहे .सप्ताह स्थळी प्रवेशद्वारावर स्टॉल लावण्यात आले. या प्रवेशद्वारा जवळ ठिकाणी दहा बाय पंधरा चे दहा स्टॉल उभारण्यात येणार असून त्यामध्ये वैद्यकीय सुविधा, पोलीस स्टेशन ,स्वागत कक्ष, देणगी कक्ष ,सप्ताह कमिटी व इतर सुविधांसाठी या स्टॉलचा उपयोग होणार आहे भोजन मंडपामध्ये प्रामुख्याने प्रसाद बनवण्यासाठी २५० कारागीर असून ८० मोठ्या कढया, २०० पातेले, ५०० बादल्या यासाठी वापरल्या जाणार आहे.

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ९ ऑगस्ट २०२४गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये वारकऱ्यांचा महाकुंभ म्हणून नोंद झालेल्या सद्गुरु योगीराज गंगागिरीजी महाराज यांच्या १७७ व्या अखंड हरिनाम सप्ताहचा शुभारंभ महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहितीआयोजकांनी दिली आहे.यावेळी निफाडचे आमदार दिलीपराव बनकर, नासिक रोडच्या आमदार सरोज ताई आहिरे,कोपरगाव चे आमदार आशुतोष काळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सिन्नर तालुक्यातील पंचाळे गावी या वर्षी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून दि.१० ऑगस्ट ते दिनांक १७ ऑगस्ट हा सप्ताह चालणार आहे .

जाहिरात

या सप्ताहाला दोनशे वर्षाची परंपर असून १७७ वर्षापासून हा सप्ताह अखंडपणे सुरू आहे. सुरुवात सकाळी दहा वाजता शोभा यात्रेने होणार असून या निमित्ताने गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर अखंड भजन मंडपात अखंड भजन सुरू होणार आहे .तीन तासांचा एक पहारा याप्रमाणे दिवसाच्या चार व रात्री चार तास असा अखंड २४ तास भजन मंडपामध्ये सुरू होणार आहे. यामध्ये नाशिक , संभाजीनगर, नगर जिल्ह्यातील दहा हजार टाळकरी भाविकांनी नोंदणी केली असून ते यामध्ये सातही दिवस सहभागी होणार आहे . अखंड हरिनाम सप्ताहाच्या आयोजन समितीने सर्व भक्त आणि भाविकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. समितीने सांगितले आहे की, या ऐतिहासिक आणि धार्मिक परंपरेत सहभागी होऊन भक्तांनी आपल्या श्रद्धेचे दर्शन घडवावे. या कार्यक्रमात सहभागी होऊन भक्तांनी नामस्मरण, कीर्तन, भजन, आणि प्रवचनांचा लाभ घ्यावा, अशी विनंती समितीने केली आहे.समितीने हा सप्ताह यशस्वी आणि भक्तिमय वातावरणात पार पडावा यासाठी सर्वांची सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

जाहिरात

 

पंचाळे पंचक्रोशीतील भाविक या सप्ताहासाठी स्वतःच्या कुटुंबातील कार्य असल्याप्रमाणे त्यांना मनधनाने या सप्ताह कार्यामध्ये सहभागी झाले आहेत. या सप्ताहासाठी ६० समित्यांची स्थापना करण्यात आली आहे यामध्ये प्रामुख्याने या समितीयांचा समावेश आहे समितीत सर्व ग्रामस्थांचा सहभाग आहे. सप्ताहासाठी ३०० एकर जमीन उपलब्ध असून सप्ताह समितीच्या माध्यमातून जमिनीचे सपाटीकरण, काटेरी झाडे काढणे, रस्ते निर्मिती, विद्युत सुविधा, पिण्याचे पाणी, शौचालय, निवास व्यवस्था ,भोजन, भजन ,कीर्तन व कृषी मंडपाच्या उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पंगतीमध्ये भाविकांना महाप्रसाद वाढण्यासाठी टँकर ट्रॅक्टर ची नोंदणी सुरू आहे

सप्ताहाच्या निमित्ताने आमदार माणिकराव कोकाटे व खासदार राजाभाऊ वाजे यांचे खास योगदान लाभले असून माजी जिल्हा परिषद सदस्य सीमंतीनी कोकाटे यांनी मोलाचे योगदान दिले आहे.

या सप्ताहाच्या निमित्ताने पंधरा ते वीस वर्षांपूर्वी ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून जीर्णोद्धार व नव्याने बांधण्यात आलेल्या ग्रामदैवत हनुमान महाराज कानिफनाथ महाराज खंडेराव महाराज पंचलिंगेश्वर विठ्ठल रुक्मिणी व रेणुका माता मंदिर तसेच गावातील इतर मंदिरांची दुरुस्ती व देवदिकांच्या मूर्तींची रंगरंगोटी करण्यात आली आहे या मंदिरांवर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे त्यामुळे गावाच्या वैभवात त्यामुळे भर पडली आहे.

 

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे