संगमनेर
रमजान ईद हा बंधूभाव व मानवतेचा संदेश देणारा सण – माजीमंत्री थोरात
रमजान ईद हा बंधूभाव व मानवतेचा संदेश देणारा सण – माजीमंत्री थोरात

संगमनेर विजय कापसे दि ३१ मार्च २०२५– भारतामध्ये विविध धर्म – पंथ – जात असूनही मानवता धर्म व भारतीयत्व हे सर्वांना जोडणारे आहे. रमजान ईद हा पवित्र सण एक महिन्याच्या उपवासानंतर येतो. जगामध्ये मुस्लिम बांधव मोठ्या आनंदाने आणि पवित्र भावनेने हा सण साजरा करतात. यामध्ये देशातील सर्व धर्मीय सहभागी होतात. एकता ही भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य असून रमजान ईद हा बंधुभाव व मानवधर्माचा संदेश देणारा सण असल्याचे प्रतिपादन काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.








