आपला जिल्हा

काकडी विमानतळ परिसरातील दुहेरी हत्याकांडातील आरोपीना स्थानिक गुन्हे शाखेकडून १२ तासाचे आत अटक

काकडी विमानतळ परिसरातील दुहेरी हत्याकांडातील आरोपीना स्थानिक गुन्हे शाखेकडून १२ तासाचे आत अटक
काकडी विमानतळ परिसरातील दुहेरी हत्याकांडातील आरोपीना स्थानिक गुन्हे शाखेकडून १२ तासाचे आत अटक
जाहिरात

राहाता विजय कापसे दि ५ एप्रिल २०२५शुक्रवार दिनांक ४ एप्रिल २०२५ रोजी रात्री साहेबराव पोपट भोसले, रा. दिघे वस्ती, पिंप्री रोड, काकडी ता. राहाता यांचे राहते घरी अज्ञात आरोपीनी जबरी चोरी करण्याच्या उद्देशाने कोणत्या तरी प्राणघातक हत्यारांनी कृष्णा साहेबराव भोसले, वय ३० व  साहेबराव पोपट भोसले, वय ६० यांना जीवे ठार मारून तसेच साकरबाई साहेबराव भोसले, वय ५५ सर्व रा. दिघे वस्ती, पिंप्री रोड, काकडी ता. राहाता यांना गंभीर जखमी करून मोटार सायकल व मोबाईल चोरून नेला. याबाबत राहाता पोलीस स्टेशन गुरनं १७१/२०२५ बीएनएस २०२३ कलम १०३ (१), १०९(१), ३१९, ३३१ (८) प्रमाणे गुन्हा दाखल होता.

जाहिरात
काकडी, ता. राहाता येथे घडलेल्या गंभीर स्वरूपाच्या गुन्हयांची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूरचे वैभव कलुबुर्मे, शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांनी तात्काळ घटना ठिकाणी भेट देऊन, गुन्हा उघडकीस आणणेबाबत स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांना  सुचना देऊन समांतर तपास करणेबाबत आदेशीत केले.

जाहिरात
नमुद आदेशा प्रमाणे अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि  हेमंत थोरात, पोसई तुषार धाकराव, अनंत सालगुडे व पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे, बापुसाहेब फोलाणे, ज्ञानेश्वर शिंदे, गणेश भिंगारदे, फुरकान शेख, गणेश लोंढे, संदीप दरंदले, अमृत आढाव, प्रमोद जाधव, जालींदर माने, बाळासाहेब खेडकर, रमीजराजा आत्तार, अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, प्रशांत राठोड, भगवान थोरात, सुनील मालणकर, बाळासाहेब गुंजाळ, अरूण मोरे, उमाकांत गावडे व चंद्रकांत कुसळकर अशांचे तीन पथक तयार करून, पथकास गुन्ह्यातील आरोपींची माहिती व शोध घेणेबाबत सुचना व मार्गदर्शन केले.

जाहिरात
 शनिवार दि ५ एप्रिल २०२५ रोजी तपास पथके तांत्रीक विश्लेषण व बातमीदाराच्या आधारे गुन्हयाचा तपास करत असताना सदरचा गुन्हा करणारे दोन संशयीत इसम हे टेम्पोमधुन सिन्नर मार्गे नाशिककडे जात असलेबाबत खात्रीशीर माहिती मिळाली. पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेल्या माहितीवरून पळशी टोलनाका, सिन्नर, जि. नाशिक येथे सापळा रचुन संशयीत इसमांचा शोध घेऊन एका टेम्पोमध्ये पाठीमागील बाजूस बसलेले संशयीत दोन इसम मिळून आल्याने संदीप रामदास दहावाड, वय १८. व  जगन काशिनाथ किरकिरे, वय २५ दोन्ही रा. तेलीम्बरपाडा, ता. मोखाडा, जि. पालघर अशांना ताब्यात घेतले.

जाहिरात आत्मा
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीना विश्वासात घेऊन गुन्हयाचे अनुषंगाने विचारपूस केली असता संदीप रामदास दहावाड याने त्याचे साथीदारासह रात्री १२.३० वा. सुमारास काकडी विमानतळ परिसरामधील एका घरामध्ये जाऊन दोन तीन जणांना लाकडी दांडक्याने व फावडयाने मारहाण केली व चोरी केल्यानंतर पळून जात असलेबाबत माहिती सांगीतली. ताब्यात घेण्यात आरोपी  संदीप रामदास दहाबाड, वय १८ व  जगन काशिनाथ किरकिरे, वय २५ दोन्ही रा. तेलीम्बरपाडा, ता. मोखाडा, जि. पालघर यांना गुन्ह्याचे तपासकामी राहाता पोलीस स्टेशनला हजर करण्यात आले असुन पुढील तपास राहाता पोलीस ठाणे हे करीत आहे.

पकडलेल्या आरोपी सह पोलिस अधिकारी
तपास पथकास संशयीत आरोपीतांचा शोध घेणेकामी सिन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक  संभाजी गायकवाड व सिन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार यांनी योग्य ती मदत केली सदरची कौतुकास्पद  कारवाई राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपूर, शिरीष वमने, उपविभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे