समता आणि व्यापारी महासंघाचा उन्हाळ्यातील स्तुत्य उपक्रम
समता आणि व्यापारी महासंघाचा उन्हाळ्यातील स्तुत्य उपक्रम

कोपरगाव विजय कापसे दि १२ एप्रिल २०२५– ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांचे नेतृत्व व मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील समता नागरी सहकारी पतसंस्था, समता चॅरिटेबल ट्रस्ट, कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ, कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशन, समता इंटरनॅशनल स्कूल या संस्थांच्या माध्यमातून अनेक सहकार, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात नवनवीन योजना व उपक्रम राबवित असून कोपरगावकरांच्या हिताची सामाजिक कार्य करत सामाजिक बांधिलकी जपत असून सध्या उन्हाळा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. या दिवसात पाणी हे अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्या प्रमाणे अन्नदान, रक्तदान हे श्रेष्ठ समजले जातात. त्या प्रमाणे जलदानाला देखील अनन्य साधारण महत्व आहे. त्यामुळे उन्हाचा वाढता तडाखा लक्षात घेता समता व कोपरगावची बाजारपेठ फुलविण्यात नेहमी अग्रभागी असणाऱ्या व्यापारी महासंघ व तालुका किराणा मर्चंट असोसिएशनच्या माध्यमातून कोपरगाव शहरातील कोपरगाव तहसील कार्यालय या ठिकाणी पिण्याच्या थंड पाण्याची पाणपोई तर शहरातील आठवडे बाजारात फिरती पाणपोई कोपरगावकरांसाठी उपलब्ध करून दिली आहे. गेल्या ८ वर्षापासून समता आणि इतर संस्थांचा हा उपक्रम सुरू असून तालुक्यातील सुत्य उपक्रम समजला जात आहे.

कोपरगाव आगारात शहरातील प्रसिद्ध व्यापारी व समता पतसंस्थेचे संचालक स्व. गुलाबचंद खेमचंद अग्रवाल यांच्या स्मरणार्थ जल मंदिराचे उद्घाटन नायब तहसीलदार प्रफुल्लित्ता सातपुते व कोपरगाव नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा सुहासिनी ओमप्रकाश कोयटे यांच्या हस्ते करण्यात आले. या पाणपोईमुळे बस स्थानकात आलेल्या प्रवाशांना जागेवर पाणी देण्याची सुविधा देखील करण्यात आलेली आहे. जागेवर पाणी नेऊन दिल्यामुळे प्रवाशांना जागा जाण्याची भीती नसतेच तसेच त्यांचे सोबत असलेले साहित्य देखील इतरत्र हलू शकत नाही. उन्हाच्या झळायापासून संरक्षण होते. स्वतः जवळ असलेल्या वस्तू चोरीला जाऊ शकत नाही. प्रत्येक उन्हाळ्यात हजाराच्या वर या पाणपोईचा लाभ प्रवासी घेत असतात.

कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ व कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशन यांच्या वतीने आठवडे बाजाराला येणारे ग्राहक, छोटे – मोठे व्यापारी, किराणा दुकानदारांसाठी फिरती पाणपोई सुरू करून उन्हाळ्यात दर सोमवारी आठवडे बाजारात जलपान सेवा देण्यात येत आहे.

आठवडे बाजारातील पाणपोई उद्घाटन प्रसंगी कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशन अध्यक्ष राजकुमार बंब, व्यापारी महासंघ कार्याध्यक्ष सुधीर डागा, संचालक महावीर सोनी, आशुतोष पटवर्धन, नरेश शेठ जोशी, हर्षल जोशी तर तहसील कार्यालयातील उद्घाटन प्रसंगी नायब तहसीलदार प्रफुल्लित्ता सातपुते, सौ.जोत्स्ना अरविंद पटेल, श्रेष्ठ नागरिक मित्र मंडळ अध्यक्ष पुष्पलता सुतार, तहसील कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते.

