आपला जिल्हा

थोरात महाविद्यालयात २६ व २७ एप्रिल रोजी साहित्य लेखन कार्यशाळा

थोरात महाविद्यालयात २६ व २७ एप्रिल रोजी साहित्य लेखन कार्यशाळा
थोरात महाविद्यालयात २६ व २७ एप्रिल रोजी साहित्य लेखन कार्यशाळा
संगमनेर विजय कापसे दि २५ एप्रिल २०२५माजी शिक्षण मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली सुसंस्कृत व समृद्ध असलेल्या संगमनेर शहरांमध्ये उद्या शनिवार दिनांक 26 एप्रिल व रविवार दिनांक 27 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10 ते 5 या वेळेमध्ये सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात महाविद्यालयात साहित्य लेखन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सौ. दुर्गाताई तांबे यांनी दिली आहे.

जाहिरात
याबाबत अधिक माहिती देताना सौ.तांबे म्हणाल्या की, अमित भास्कर मराठी बालकुमार साहित्य शाखा संगमनेर व लाडोबा प्रकाशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने संगमनेर शहरात दोन दिवस ही साहित्य लेखन कार्यशाळा संपन्न होणार आहे. यामध्ये साहित्य लेखन कसे करावे शिक्षकांनी काय आणि कसे लिहावे याचबरोबर विविध सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.

या साहित्य लेखन कार्यशाळेचे उद्घाटन शनिवारी सकाळी 10 वाजता के बी दादा सभागृह येथे जयहिंद लोक चळवळीचे संस्थापक माजी आमदार डॉ.सुधीर तांबे, माध्यमिक परीक्षा मंडळाच्या माजी अध्यक्ष डॉ.शकुंतला काळे, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवी एकनाथराव आव्हाड ,बालकुमार साहित्य संमेलनाची माजी अध्यक्ष गोविंदराव गोडबोले,लाडोबा प्रकाशाचे घनश्याम पाटील, उद्योजक डॉ.संजय मालपाणी यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे.

जाहिरात

यामध्ये शिक्षकांनी काय आणि कसे लिहावे या विषयावर डॉ.शकुंतला काळे, कथाकथन तंत्र आणि मंत्र या विषयावर गोविंद गोडबोले, प्रत्यक्ष कविता लेखन स्वरूपातील चला कविता लिहूया यामध्ये महाराष्ट्रातील नामवंत सिने गीतकार व कवयित्री ज्योती घनश्याम, अभिवाचन कला फुलवा मध्ये नामवंत अभिवाचक व्हाईस ओव्हर आर्टिस्ट रसिका तुळजापूरकर, लेखक दिग्दर्शक अक्षय उपळेकर मार्गदर्शन करणार आहेत याचबरोबर घनश्याम पाटील ही या सत्रामध्ये सहभागी होणार आहेत लेखकांच्या गप्पा या सत्रांमध्ये नागेश शेवाळकर प्रशांत केंदळे, डॉ. संतोष खेडलेकर सहभागी होणारा असून पाऊस कवितांच्या या निमंत्र्यांच्या कवी संमेलनामध्ये महाराष्ट्रातील नामवंत कवी शशिकांत शिंदे अध्यक्षपद भूषवणार आहेत.

जाहिरात

या कार्यशाळेच्या समारोप नामवंत ग्रामीण साहित्यिक प्रा.मा.रा.लामखडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बाळासाहेब वाघ यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे तरी या साहित्य संमेलनाचा जास्तीत जास्त लेखक साहित्यिक व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे सचिव संदीप वाकचौरे, दत्तात्रय आरोटे, स्मिता गुने, मुकुंद डांगे, शांताराम डोंगरे,तुषार गायकर,अनिल देशपांडे, डॉ.संजय दळवी, प्रा विश्वनाथ भुजबळ, श्री.जोशी व कार्यकारी समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे