ॲड.संदीप वर्पे यांच्या वाढदिवसानिमित्त गोशाळेत केले चारा वाटप
ॲड.संदीप वर्पे यांच्या वाढदिवसानिमित्त गोशाळेत केले चारा वाटप

कोपरगाव विजय कापसे दि २९ एप्रिल २०२५– राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तथा अहिल्यानगर जिल्हा कार्याध्यक्ष ॲड संदीप वर्पे यांचा सोमवार दि २८ एप्रिल रोजी असलेल्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने गोशाळेतील मुक्या जनावरांना हिरव्या चाऱ्याचे वाटप करत आपला मित्र ॲड.संदीप वर्पे यांचा वाढदिवस साजरा केला.

मागील आठवड्यात पहलगाम येथील झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात निष्पाप २८ भारतीयांना जीव गमवावा लागला तर अनेक भारतीय नागरिक जखमी झाले होते या हल्ल्याच्या निषेधार्थ आपला वाढदिवसाचा आनंद साजरा करणे योग्य ठरणार नाही या भावनेतून ॲड.संदीप वर्पे यांनी आपल्या हितचिंतक, राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाचे कार्यकर्ते मित्रपरिवाराला वाढदिवस साजरा न करण्याचे तसेच कुठेही शुभेच्छा फलक न लावण्याचे आवाहन केले होते याच आवाहनाचा मान राखत कार्यकर्त्यांनी गोशाळेत गोमातेची सेवा म्हणून दरवर्षी प्रमाणे याही वर्षी हिरव्या चाऱ्याचे वाटप करत आपला मित्र ॲड.संदीप वर्पे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.












