धोत्रे ग्रामपंचायतीचा अनोखा उपक्रम;मजुरांच्या हस्ते केले झेंडावंदन
धोत्रे ग्रामपंचायतीचा अनोखा उपक्रम;मजुरांच्या हस्ते केले झेंडावंदन
जाहिरात
कोपरगाव विजय कापसे दि २ मे २०२५-तालुक्यातील धोत्रे ग्रामपंचायत नेहमीच अनोखे उपक्रम राबवत आपले एक वेगळेपण सिद्ध करत असते असंच गुरुवार दि १ मे रोजी २०२५ रोजी महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिनाचे औचित्य साधत लोकनियुक्त सरपंच प्रदीप चव्हाण व ग्रामपंचायत अधिकार अविनाश पगारे यांच्या संकल्पनेतुन ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण रोजगार हमी मजुर एकनाथ साबळे व दिलीप गुंजाळ या मजुरांच्या हस्ते करत पुन्हा एकदा एक वेगळेपण सिद्ध केले आहे.
जाहिरात
ग्रामपंचायतीने राबविलेल्या या अनोख्या उपक्रमाबद्दल सरपंच प्रदीप चव्हाण यांनी बोलताना सांगितले की, महाराष्ट्र दिनानिमित्त मजुराच्या हस्ते ग्रामपंचायतचे झेंडावंदन करताना मनापासून आनंद होत आहे. धोत्रे ग्रामपंचायतची वाटचाल सर्व घटकांना सोबत घेऊन विकासाच्या दृष्टीने सुरु असून धोत्रे गाव स्वछता अभियान शासनाचे विविध उपक्रम यात नेहमीच आघाडीवर राहिले आहे तालुक्यातील एक आदर्श ग्रामपंचायत म्हणून धोत्रे गाव नावारूपाला येत आहे. धोत्रे ग्रामपंचायत कर्मचारी व रोजगार हमी मजुर यांच्या मेहनतीवर गावातील स्वछता, वृक्षाची काळजी या सर्व गोष्टी मजूर कामगारांमुळे शक्य आहे. आजच्या या कामगार दिनानिमित्त त्यांचा सन्मान होणे गरजेचे वाटले म्हणून त्यांचा हस्ते ध्वजारोहण करत त्यांना सर्वोच्च मान दिल्याचे सांगितले.जाहिरात
या प्रसंगी संजीवनी बँकेचे संचालक सुरेश जाधव यांच्या हस्ते दोन्ही मजुरांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला तर या झेंडावंदनास उपसरपंच, सर्व सदस्य, महसूल अधिकारी, पोलीस पाटील ,जि.प.शाळा मुख्याध्यापक त्यांचे शिक्षक वृंद तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रवीण चव्हाण सामाजिक कार्यकर्ते किरण चव्हाण, आधोडे सर ,ग्रामपंचायत कर्मचारी, आरोग्य विभाग कर्मचारी, समस्त ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्र संचालन संजय रोकडे यांनी केले .