आपला जिल्हा

कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व तांत्रिक विद्यालयाचा एस.एस.सी.परीक्षेचा निकाल ९०.०९ टक्के

कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व तांत्रिक विद्यालयाचा एस.एस.सी.परीक्षेचा निकाल ९०.०९ टक्के

विद्यालयाची उज्वल निकालाची परंपरा कायम

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १३ मे २०२५ :महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या  फेब्रुवारी-मार्च २०२५ एस.एस.सी. परीक्षेचा नुकताच संकेतस्थळावर निकाल जाहीर झाला असून यात कोपरगाव येथील कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व तांत्रिक विद्यालयाचा निकाल ९०.०९% लागला असल्याची माहिती मुख्याध्यापक काशिनाथ लव्हाटे यांनी दिली आहे.

जाहिरात

महाराष्ट्र स्टेट बोर्डाने फेब्रुवारी-मार्च २०२५ घेतलेल्या एस. एस. सी. परीक्षेसाठी एकूण २२२ विद्यार्थी प्रविष्ट झालेले होते. यामध्ये २० विद्यार्थी विशेष प्राविण्य व ६५  विद्यार्थी फर्स्ट क्लास विद्यार्थ्यांनी गुण मिळविले आहे. विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण होवून उज्वल यश संपादन केले आहे. यामध्ये प्रथम तीन विद्यार्थी पुढीलप्रमाणे असून यामध्ये वाघ चैतन्य दीपक ९४% गुण मिळवून शाळेत प्रथम येण्याचा मान मिळविला आहे.तर उंडे सोहम नंदन ९३.२० % गुण मिळवून या विद्यार्थ्याने द्वितीय क्रमांक पटकावला आहे तर शेळके ओमकार अशोक या विद्यार्थ्याने ९२.२० गुण मिळवून तृतीय क्रमांक व मिळविला आहे.

जाहिरात

उज्वल यश संपादन करणाऱ्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व तांत्रिक विद्यालयाचे स्कूल कमिटी चेअरमन व सदस्य शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य, पालक शिक्षक संघ, माता पालक संघ, विद्यालयाचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षिका आदी सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी व पालक वर्ग यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षकांचे अभिनंदन करून विद्यार्थ्यांना व विद्यार्थ्यांच्या पालकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे