टाकळी मध्ये अभिनव उपक्रम; जातीच्या दाखल्याचे वितरण
टाकळी मध्ये अभिनव उपक्रम; जातीच्या दाखल्याचे वितरण
टाकळी मध्ये अभिनव उपक्रम; जातीच्या दाखल्याचे वितरण

कोपरगाव विजय कापसे दि २५ जुलै २०२५– राज्याचे मुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस राज्यभर विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला कोपरगाव मतदार संघात देखील संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे,माजी आमदार स्नेहलता कोल्हे, युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करणात आला.

त्याच अनुषंगाने तालुक्यातील टाकळी येथील आदिवासी समाजाच्या लाभार्थ्यांना जातीचे दाखले वाटप करत शासकीय कार्यालयात त्यांना माराव्या लागणारे हेलपाटे या पासून दिलासा दिला या प्रसंगी त्या आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता.

या प्रसंगी सरपंच संदीप देवकर, मा सभापती सुनिल देवकर, उपसरपंच संजय देवकर, पोलिस पाटील राजेंद्र देवकर, मा सदस्य सुरेश मालकर,ज्ञानेश्वर जगदाळे आदी टाकळी ग्रामस्थच्या उपस्थित वाटप करण्यात आले.



