गाण्याच्या माध्यमातून खोटी व बनावट टिका करणाऱ्या कुणाल कामरा वर गुन्हा दाखल करा
कोपरगाव तालुका युवा सेनेच्या वतीने पोलीस स्टेशनला निवेदन

कोपरगाव विजय कापसे दि २४ मार्च २०२५– महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना गतिमान विकास करत जनतेतील मुख्यमंत्री म्हणून व सध्या उपमुख्यमंत्री म्हणून ओळख असणाऱ्या एकनाथ शिंदे साहेबांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून कुणाल कामरा नामक कॉमेडियनने गाण्याच्या माध्यमातून खोटी व बनावट टीका करून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याने केलेले कृत्य नालायकपणाचे असून शिवसेना पक्षाच्या वतीने त्याचा निषेध करत या त्याच्यावर तातडीने गुन्हा दाखल व्हावा.

यासाठी कोपरगाव तालुका शिवसेना व युवा सेनेच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर व ग्रामीण पोलीस निरीक्षक यांना युवासेना तालुकाप्रमुख अभिषेक आव्हाड, अक्षय जाधव, अहिल्यानगर जिल्हा समन्वयक शिवाजी जाधव, अभिषेक आव्हाड, सुनील साळुंके, मनिल नरोडे आदीनी निवेदन देत कारवाईची मागणी केली आहे.


त्यामुळे या समाजकंटकाच्या कृतीने समाजामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. कायदा सुव्यवस्था धोक्यात आलेली आहे. महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिक , पदाधिकारी व सामान्य जनतेच्या भावना दुखावलेल्या आहे त्यामुळे या आरोपीवर तातडीने गुन्हा दाखल करावा व कडक कारवाई करावी अशी मागणी निवेदनात केली असून जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे यांच्या सूचनेनुसार अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक व शिर्डी उपविभागीय पोलिस अधीकारी यांना देखील निवेदनाच्या प्रति पाठवण्यात आलेल्या आहेत.

