किराणा दुकान फोडणाऱ्यास तालुका पोलीसांनी ४८ तासात केले जेरबंद
किराणा दुकान फोडणाऱ्यास तालुका पोलीसांनी ४८ तासात केले जेरबंद
कोपरगाव विजय कापसे दि ९ ऑगस्ट २०२५–कोपरगांव तालुका पोलीस स्टेशनला विलास मनोहर वाबळे वय-५० वर्ष धंदा- किराणा दुकाण (व्यवसाय) रा. वाबळेवस्ती सुरेगाव ता. कोपरगांव यांनी दिनांक ७ ऑगस्ट २०२५ रोजी दिलेल्या फिर्यादी वरुन २३५/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३३१ (१),३०५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन फिर्यादीने दिलेल्या फिर्यादी प्रमाणे दिनांक ५ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ९.०० वा ते दिनांक ६ ऑगस्ट २०२५ रोजी पहाटे ४.४५ वाजण्याच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांचे मालकीचे मातोश्री किराणा अॅण्ड जनरल स्टोअर्स सुरेगाव ता. कोपरगाव या दुकाणाचे शटर कशानेतरी उचकटुन आत प्रवेश करुन दुकाणातुन रक्कम रुपये ५४ हजार ४५५ रु कि चा किराणा सामानाचा मुद्देमाल ज्यामध्ये किराना वस्तु व रोख रक्कम, घरफोडी चोरी करुन चोरून नेले आहे अशा फिर्यादीवरुन सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
जाहिरात
सदर गुन्हयातील अज्ञात आरोपी व चोरीस गेलेल्या मुददेमालाचा तपास करीत असतांना कोपरगाव ग्रामीण पोलीस निरीक्षक संदिप कोळी यांना मिळालेल्या गोपनिय माहीती प्रमाणे सदरचा गुन्हा हा सराईत गुन्हेगार असलेला कपिल राजु पिंपळे वय २७ वर्षे धंदा मजुरी रा. मोतीनगर कोळपेवाडी ता. कोपरगांव याने त्याचा अल्पवयीन साथीदार याचे सोबत मिळून केलेला आहे. अशी माहीती मिळाल्याने त्यांनी तात्काळ सपोनि धरमसिंग सुंदरडे, पोउपनि वैशाली मुकणे, पोलीस अंमलदार दहीफळे, गुंजाळ, वाघ यांच्यासह कपिल राजु पिंपळे वय २७ वर्षे धंदा- मजुरी रा. मोतीनगर कोळपेवाडी ता. कोपरगांव याचा त्याचे राहते घरी जावुन शोध घेतला असता तो घरी मिळुन आला. त्यास ताब्यात घेवुन गुन्हयाबाबत विश्वासात घेवुन विचारणा केली असता त्याने सदरचा गुन्हा हा त्याचा अल्पवयीन याचे सोबत मिळुन केलेला असल्याचे मान्य केले. पोलीसांनी पंचांच्या समक्ष त्याचे राहते घराची झडती घेतली असता त्याचे ताब्यातून गुन्हयातील चोरीस गेलेल्या मालापैकि खालील वर्णनाचा व किंमतीचा मुददेमाल व त्याचा मोबबाईल फोन मिळून आल्याने पोलीसांनी सदरचा मुददेमाल जप्त केलेला आहे.
जाहिरात
१) २१६० रुपये किंमतीच्या मुरली कंपनीचे सोयाबीन रीफाईन ऑईलच्या एकुण तील कॅन. प्रत्येकि पाच लिटर क्षमतेच्या. त्यावर प्रत्येकि ७२० रुपये रु. छापील किंमत असलेल्या.
२) ६८८ रुपये किंमतीचे कोथमिरे धना पावडर चे एकुण ८ सीलबंद पाकिटे. प्रत्येकि २० ग्रॅम वजनाचे व त्यावर ८६ रुपये प्रत्येकि किंमत असलेले.
३) ६०० रुपये किंमतीचे महादेव प्युअर सेलम हल्दी पावडरचे ३ सीलबंद पाकिटे. प्रत्येकि ५०० ग्रॅम वजनाचे व २०० रुपये प्रत्येकि किंमत असलेले.
४) १४०० रुपये किंमतीचे महादेव प्युअर सेलम हल्दी पावडरचे १४ सीलबंद पाकिटे. प्रत्येकि २०० ग्रॅम वजनाचे व १०० रुपये प्रत्येकि किंमत असलेले.
५) ४०० रुपये किंमतीचे सपट परिवार कंपनीचे प्रत्येकि १०० ग्रॅम वजनाचे ८ सलिबंद पाकिटे, त्यावर प्रत्येकि ५० रुपये छापील किंमत असलेले.
६) १८९० रुपये किंमतीचे सपट परिवार कंपनीचे पिवळया रंगाचे एकुण १८९ सिलबंद छोटे पाकिटे. त्यावर प्रत्येकि १० रुपये छापील किंमत असलेले.
७) १३० रुपये किंमतीचे सपट परिवार कंपनीचे हिरव्या रंगाचे एकूण २६ सिलबंद छोटे पाकिटे. त्यावर प्रत्येकि ५ रुपये छापील किंमत असलेले व १५ ग्रॅम प्रत्येकि वजन असलेले,
८) ८० रुपये किंमतीचे सपट परिवार कंपनीचे हिरव्या रंगाचे एकुण २ सिलबंद पाकिटे. त्यावर प्रत्येकि ४० रुपये छापील किंमत असलेले व १०० ग्रॅम प्रत्येकि वजन असलेले.
९) ८० रुपये किंमतीचे जयानंद एम.डी. कंपनीचे २ सिलबंद पाकिटे, प्रत्येकि १०० ग्रॅम वजनाचे व त्यावर ४० रुपये छापील किंमत असलेले.
१०) १०००० रुपये किंमतीचा एक VIVO Y400 PRO 5G कंपनीचा पर्पल रंगाचा मल्टीमिडीया मोबाईल फोन.
जाहिरात
असा एकूण १७,४२८/- रुपये किंमतीचा मुददेमाल आरोपींकडून जप्त करण्यात आलेला असुन सदर गुन्हयात पोलीसांनी सराईत गुन्हेगार आरोपी कपिल राजु पिंपळे यास दिनांक ८ ऑगस्ट रोजी अटक केलेली असुन त्यास दिनांक ९ ऑगस्ट रोजी मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सो. कोपरगांव यांचे न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने आरोपीस दिनांक ११ ऑगस्ट २०२५ पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिलेला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोनि धरमसिंग सुंदरडे हे करीत आहे.
सदरची कार्यवाही ही सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, सोमनाथ वाघचौरे, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर, शिरिष वमने उपविभागीय पोलीस अधीकारी शिर्डी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदिप कोळी सपोनि धरमसिंग सुंदरडे, पोउपनि वैशाली मुकने पोलीस अंमलदार पोहेकॉ दहीफळे, पोकॉ वाघ, पोकॉ गुंजाळ, पोकॉ सुकटे, पोकॉ सानप यांचे पथकाने केलेली आहे.