आपला जिल्हा

स्त्रोत बळकटीकरण व शाश्वतीकरण प्रशिक्षण शिबीर संपन्न

स्त्रोत बळकटीकरण व शाश्वतीकरण प्रशिक्षण शिबिर संपन्न

स्त्रोत बळकटीकरण व शाश्वतीकरण प्रशिक्षण शिबिर संपन्न

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ३० जुन २०२५ग्रामीण भागातील जलव्यवस्थापन सुदृढ करण्याच्या दृष्टीने ‘स्त्रोत बळकटीकरण व शाश्वतीकरण’ या विषयावर दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला. कार्यक्रमाचे आयोजन जल जीवन मिशन राज्य पाणी व स्वच्छता मिशन ( SWSM), मंत्रालय महाराष्ट्र शासन राज्य, बेलापूर,मुंबई जल जीवन मिशन मिशन स्तर 3 (टप्पा 4) जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद अहिल्यानगर यांच्या सहकार्याने व नवनिर्माण सर्व समाज हितार्थ संस्था नंदुरबार मुख्य संसाधन संस्था ( KRC) यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. या प्रशिक्षणात सुरेगाव परिसरामधील ग्रामपंचायतमधील – ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समितीचे ५ सदस्य त्यामध्ये मागासवर्गीय (अजा/अज) एक सदस्य व एक महिला सदस्य यापैकी पाच प्रतिनिधींना प्रशिक्षण देण्यात येत आहे.

जाहिरात

दिनांक २७ जुन २०२५ कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर येथे दोन दिवसीय प्रशिक्षणाचा उद्देश म्हणजे उपलब्ध जलस्रोतांचे योग्य नियोजन करून त्यांचा दीर्घकालीन उपयोग सुनिश्चित करणे. कार्यक्रमात पाण्याचे पुनर्भरण, पर्जन्य जलसंचयन, बंधारे, शोषखड्डे, तसेच सांडपाण्याचे पुनर्वापर यावर सविस्तर माहिती देण्यात आली.
स्त्रोत बळकटीकरण व शाश्वतीकरण प्रशिक्षणाचे मा. श्री. संदिप दळवी गटविकास अधिकारी पंचायत समिती कोपरगाव यांच्या हस्ते तुळशीच्या झाडाला पाणी घालून औपचारिक उद्घाटन करण्यात आले. श्री बाबासाहेब देसले प्रकल्प संचालक जल जीवन मिशन कक्ष अहिल्यानगर, हर्षाली जाधव मनुष्यबळ विकास तज्ञ जिल्हा परिषद अहिल्यानगर, यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रशिक्षणाच्या उद्घाटन प्रसंगी गटविकास अधिकारी श्री. संदिप दळवी यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले. आपल्या भाषणात त्यांनी जलसंवर्धनाच्या गरजेवर भर देत सांगितले की, “आपल्याकडे आज पाणी आहे याचा अर्थ उद्याही असेलच असं नाही. भविष्यातील दुष्काळाचे संकट टाळण्यासाठी जलस्त्रोत बळकटीकरण ही काळाची गरज बनली आहे.” त्यांनी गाव पातळीवर लोकसहभागातून राबवता येणाऱ्या जलप्रकल्पांबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचे आवाहन केले.

जाहिरात

आजच्या काळात जल हे एक अत्यंत मौल्यवान आणि आवश्यक संसाधन आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे, औद्योगिकीकरणामुळे आणि हवामान बदलांमुळे पाण्याची कमतरता आणि त्याचे परिणाम अधिक तीव्र होत आहेत. त्यामुळे जलस्रोतांचे संवर्धन, व्यवस्थापन आणि बळकटीकरण करणे ही काळाची गरज बनली आहे. विशेषतः ग्रामीण भागांमध्ये पाण्याची कमतरता ही मोठी समस्या बनत चालली आहे. या समस्येवर उपाय म्हणून जल स्रोत बळकटीकरण हे अत्यंत प्रभावी व आवश्यक पाऊल ठरते. पाणीपुरवठा योजना यशस्वीपणे चालवायची असल्यास जलस्त्रोत जलसमृद्ध असणे अत्यंत आवश्यक आहे. असे मा.रविंद्र सातदिवे प्रकल्प समन्वयक यांनी प्रस्तावना मध्ये सागितले आहे.

जाहिरात गौतम

प्रशिक्षणाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून दिगंबर निकाळजे प्रवीण प्रशिक्षक यांनी भुजल संशोधन पध्दती आणि तंत्रे, भुजल व्यवस्थापन नियोजन व ओळख, भुजल पुनर्भरणाचे तंत्रे, भूपृष्ठावरील पाण्याचा पुनर्भरण, नदी- नाले तंत्र यावर मार्गदर्शन केले आहे. तसेच प्रशिक्षणामध्ये वैशाली काळे प्रवीण प्रशिक्षक जल जीवन मिशन चा आढावा, समुदाय आधारित स्त्रोत व्यवस्थापन, भारतीय जल धोरण योजना या विषयावर दोन दिवस प्रशिक्षण देण्यात आले आहे.

जाहिरात

याप्रसंगी मान्यवर यांच्या हस्ते प्रमाणपत्र, बॅग, पेन, माहिती पुस्तिका, नोटपॅड देखील प्रशिक्षणार्थी यांना वाटप करण्यात आले. या प्रशिक्षणाला मा. सचिन बोरुडे गट समन्वयक (BRC) पंचायत समिती कोपरगाव, नवनिर्माण सर्व समाज हितार्थ संस्थेचे अध्यक्ष मा.रवि गोसावी, रविंद्र सातदिवे प्रकल्प समन्वयक, दिगंबर निकाळजे, कल्याण रधवे, वैशाली काळे प्रवीण प्रशिक्षक, कोपरगावतालुक्यातील सर्व सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, आशा ताई, अंगणवाडी सेविका, जलसुरक्षक यांची उपस्थिती होते.
प्रशिक्षणाचे सूत्रसंचालन रुपाली खरात यांनी केले आहे. प्रशिक्षणाच्या शेवटी सर्व प्रशिक्षणार्थींना मा. श्री. संदिप दळवी गटविकास अधिकारी पंचायत समिती कोपरगाव यांचा हस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात आले आहे. सर्व मान्यवराचे व प्रशिक्षणार्थीचे आभार राजेश्री बागडे यांनी केले. राष्ट्रगीत घेवून प्रशिक्षणाची सांगता झाली.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे