आपला जिल्हा

शाळकरी मुलांच्या हस्ते क्रेडाईच्या वतीने ‘हिरवळ’ वाढवण्याचा प्रेरणादायी उपक्रम

शाळकरी मुलांच्या हस्ते क्रेडाईच्या वतीने ‘हिरवळ’ वाढवण्याचा प्रेरणादायी उपक्रम
शाळकरी मुलांच्या हस्ते क्रेडाईच्या वतीने ‘हिरवळ’ वाढवण्याचा प्रेरणादायी उपक्रम
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ११ जुलै २०२५सध्याच्या प्रदूषणयुक्त वातावरणात आणि वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर निसर्गसंवर्धन ही काळाची गरज आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड ही अत्यावश्यक बाब मानली जात आहे. हे महत्त्व लक्षात घेऊन कोपरगाव शहरातील क्रेडाई संस्थेच्या वतीने शहरातील साई सिटी परिसरात शाळेतील चिमुकल्यांचा उपस्थितीत वृक्षारोपण करत ‘हिरवळ’ वाढवण्याचा प्रेरणादायी उपक्रम राबवत लहानग्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले आणि त्यांना झाडांचे आपल्या जीवनातील महत्त्व समजावून सांगण्यात आले.

जाहिरात

‘झाडे लावा, झाडे जगवा’ हा संदेश रुजवण्याचा हा एक सामाजिक प्रयत्न होता. क्रेडाई  या बांधकाम व्यवसायिकांच्या संस्थेकडून वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात त्याचाच एक भाग म्हणून आज मंगळवारी सर्वांनी एकत्रित येत वृक्षारोपण करत एक सामाजिक जबाबदारी पार पाडण्यात आली.

जाहिरात
याप्रसंगी कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक सुहास जगताप, नगररचना विभागाचे किरण जोशी तसेच क्रेडाईचे अध्यक्ष राजेश ठोळे आणि सदस्य तसेच ट्युलिप शाळेतील विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षरोपण करत त्या झाडाच्या संरक्षणासाठी संरक्षण जाळी बसवण्यात आली. क्रेडाई संस्थेच्या वतीने दरवर्षी मोठ्या स्वरूपात वृक्षरोपण मोहीम राबविली जाते आणि त्यापैकी ९०% झाडे जगली असल्याची माहिती क्रेडाईचे अध्यक्ष राजेश ठोळे यांनी दिली.

जाहिरात
सदर कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष राजेश ठोळे,  सचिव राहुल भारती , खजिनदार हिरेन पापडेजा, माजी अध्यक्ष प्रसाद नाईक, दिनार कुदळे, मनीष फुलफगर, चंद्रमोहन पापडेजा, याकूब शेख, चंद्रकांत कवले ,दिपक जाधव , मनोज अग्रवाल, नरेश गणोरकर, विजय कुहिले, विक्रांत सोनवणे, योगेश मोरे,अमोल असणे, जय बोरा, ओंकार भट्टड, यश विसपुते, प्रणित कातकडे, सिद्धेश कपिले स्वप्निल जाधव, नगररचना विभागाच्या अश्विनी पिंगळ, रश्मी प्रधान, आदींसह ट्यूलिप शाळेतील विद्यार्थी मुख्याध्यापक,शिक्षक, व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे