आपला जिल्हा

सुख म्हणजे नक्की काय असतं फेम संजय पाटील यांनी घेतली मा.मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट

सुख म्हणजे नक्की काय असतं फेम संजय पाटील यांनी घेतली मा.मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट
सुख म्हणजे नक्की काय असतं फेम संजय पाटील यांनी घेतली मा.मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट
संगमनेर विजय कापसे दि १३ नोव्हेंबर २०२५ स्टार प्रवाह या दूरचित्रवाहिनी वरील अत्यंत लोकप्रिय असलेली सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील अभिनेता संजय पाटील व त्यांची पत्नी लेखिका अबोली गोखले यांनी आज मा महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांची सदिच्छा भेट घेऊन चित्रपट मनोरंजन साहित्य या विविध विषयांवर चर्चा केली.

जाहिरात
शिवाजीनगर सुदर्शन सिने अभिनेते व संगमनेरचे जावई संजय पाटील व त्यांची पत्नी अबोली गोखले यांनी लोकनेते बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. यावेळी समवेत आमदार सत्यजित तांबे, डॉ.जयश्रीताई थोरात, आनंद गोखले, गणेश गुंजाळ आदींसह विविध कार्यकर्ते उपस्थित होते.

जाहिरात

सुख म्हणजे नक्की काय असतं ही स्टार प्रवाह वरील मालिका घराघरात पोचली असून अत्यंत लोकप्रिय ठरली आहे. यामधील संजय पाटील यांची भूमिका ही मध्यवर्ती असून त्यांच्या पत्नी अबोली गोखले या लेखिका आहेत. नवीन नगर रोड येथील रहिवासी इंजिनीयर आनंद गोखले यांच्या त्या कन्या असून संजय पाटील हे संगमनेरचे जावई आहेत.

जाहिरात

यावेळी त्यांनी चिरंजीव हे महारथी कर्ण यांच्या जीवनावर आधारित असलेले अबोली आनंद लिखित हे पुस्तक माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सतीश तांबे यांना भेट दिली याचबरोबर चित्रपट मालिका आणि साहित्य या विषयावर सविस्तर चर्चा केली.

यावेळी अभिनेते संजय पाटील म्हणाले की, यशवंतराव चव्हाण यांचा समृद्ध वारसा लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी जोपासला आहे. साहित्य, कला, क्रीडा, शिक्षण, सहकार, समाजकारण,कृषी, ग्रामीण विकास या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. संगमनेर शहर व तालुका हा विकसित आणि वैभवशाली आहे. तो माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यामुळे. महाराष्ट्रात अनेक शहरे फिरण्याचा योग येतो. परंतु इतके भव्य दिव्य अद्यावत बस स्थानक, वैभवशाली इमारती,शांतता सुव्यवस्था असलेले शहर म्हणून संगमनेरचे पहिले नाव येते. अथक परिश्रमातून केलेले हे काम आहे. विकासाबरोबर साहित्य संस्कृतीला आणि कलाक्षेत्रालाही लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी कायम प्रोत्साहन दिले आहे. त्यांच्या प्रती अनेक कलाकारांना मोठा आदर आहे. त्यांच्या समवेत भेट जीवनातील आनंदाचा ठेवा असल्याचे ते म्हणाले.

तर माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, मराठी मालिका आणि चित्रपटांमधून अनेक निवेदित कलाकार अत्यंत दर्जेदार भूमिका करत आहेत. संदीप पाटील हे संगमनेरचे जावई असल्याचा आम्हा सर्वांना अभिमान आहे. महारथी कर्ण हा मोठा विषय आहे. शिवाजी सावंत यांच्या मृत्युंजय कादंबरी नंतर कारणावरती अबोली गोखले या संगमनेरच्या कन्येने लिहिलेले चिरंजीव हे पुस्तक नक्कीच सर्वांसाठी वाचनीय ठरणारे आहे.

तर आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका घराघरात पोहोचली आहे आणि त्याचे सर्व श्रेय संदीप पाटील व त्यांच्या टीमला आहे. यावेळी संगमनेर मधील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे