कोपरगाव येथील महिला समुपदेशन केंद्र बंद करण्याची वेळ -डॉ.अशोक गावित्रे

कोपरगाव येथील महिला समुपदेशन केंद्र बंद करण्याची वेळ -डॉ.अशोक गावित्रे
कोपरगाव येथील महिला समुपदेशन केंद्र बंद करण्याची वेळ -डॉ.अशोक गावित्रे

Kopargaon vijay kapse दि ८ जुन २०२६– महिला समुपदेशन केंद्र (Women’s Counseling Center) हे महिलांच्या वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक आणि कायदेशीर समस्यांवर मार्गदर्शन व समुपदेशन देणारे केंद्र असते. महिलांना सुरक्षित वातावरणात त्यांच्या समस्या मांडता याव्यात आणि योग्य तोडगा मिळावा हा यामागील उद्देश असतो. मात्र जागे अभावी हे केंद्र बंद करण्याची वेळ आली आहे महिलांवर व बालकांवर होणाऱ्या अत्याचारांना प्रतिबंध करून त्यांना संरक्षण मदत उपलब्ध करून देण्याचे दृष्टीने केंद्र शासनाने प्रामुख्याने ज्या सूचना केलेल्या होत्या त्या अनुषंगाने उपयोजना करण्यासाठी अप्पर मुख्य सचिव गृह यांच्या अध्यक्षतेखाली कृती दलाची स्थापना करण्यात आली होती सदर कृती दलाच्या बैठकीमध्ये झालेल्या विचार विनिमयानुसार टाटा सामाजिक विज्ञान संस्था मुंबई या संस्थेकडून मुंबईतील तीन पोलीस ठाण्यात मध्ये सन 1994 पासून चालविण्यात येणाऱ्या कौटुंबिक हिसाग्रस्त व पीडित महिलांसाठीच्या समुपदेशक केंद्राच्या धर्तीवरच आणखी काही ठिकाणी महिला समुपदेशन केंद्र चालवण्याची शिफारस कृती दराने केली होती त्या अनुषंगाने संयुक्त राष्ट्र संघटनेच्या युनिफॅम या आंतरराष्ट्रीय संस्थेने तीन वर्षाच्या कालावधी करता उपलब्ध करून दिलेल्या निधीतून राज्यातून समुपदेशन केंद्र चालविण्यात येत होती दिनांक 5 /12 ?2025 च्या शासन निर्णयानुसार सदर महिला समुपदेशन केंद्रे राज्य शासना मार्फत चालवण्यासाठी निर्णय घेण्यात आला त्या अनुषंगाने सध्या राज्य शासनामार्फत 35 जिल्ह्यात 105 महिला समुपदेशन केंद्रे कार्यरत आहे

समुपदेशन केंद्र हे जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी पोलीस स्टेशनच्या आवारात सुरू करण्याच्या शासन निर्णय मान्यता देखील देण्यात आली आहे सदर केंद्रांना आवश्यक जागा फर्निचर टेलिफोन स्टेशनरी व इतर मूलभूत सुविधा देखील पोलीस स्टेशन उपलब्ध करून द्यायचे आहेत समुपदेशन केंद्र हे तात्काळ कार्य करण्याबाबत संमती जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी करावी व सदर समुपदेशक केंद्र कार्यान्वित झाल्याबाबत पोलीस अधीक्षक यांनी अहवाल आयुक्त महिला व बाल विकास पुणे यांना सादर करावा अशा सर्व तरतुदी असताना कोपरगाव येथील महिला समुपदेशन केंद्राला जागाच उपलब्ध होत नाहीये अशी माहिती कोपरगाव तालुक्याचे महिला समुपदेशक वैशाली झाल्टे तसेच सचिन विघे यांनी दिली आहे जुन्या पोलीस स्टेशनचे नवीन बांधकाम सुरू असल्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात पंचायत समिती कोपरगाव येथील घरकुल डेमो हाऊस येथे सदर केंद्र हलविण्यात आले होते परंतु तेथे राज्य व केंद्र स्तरावरील तपासणी पथकाद्वारे डेमो हाऊस तपासणी कामी येणार होते त्यामुळे सदर केंद्र हे पोलीस स्टेशन किंवा तहसील कार्यालय किंवा इतर कार्यालयाच्या इमारतीत स्थलांतरित करण्यात यावे अशा स्वरूपाचं पत्र पंचायत समितीकडून त्यांना देण्यात आले सध्या समुपदेशक केंद्रासाठी जागाच उपलब्ध नसल्याने पोलीस स्टेशनमध्ये मध्ये देखील वेळोवेळी पाठपुरावा करत असून तेथे देखील त्यांना जागा उपलब्ध होत नाहीये. वेळोवेळी त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना ही बाब निदर्शनास आणून देखील त्यावर कुठलाही मार्ग निघत नाही या अभावी हे केंद्र बंद करण्याची वेळ आलेली आहे वरिष्ठ पातळीवर देखील त्यांचा पाठपुरावा सुरू असून लवकरच काहीतरी मार्ग निघावा यासाठी डॉक्टर अशोक गावित्रे हे वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करत असून लवकरच मार्ग निघेल अशी आशा त्यांना असून जागा उपलब्ध न झाल्यास हे समुपदेशन केंद्र बंद होण्या च्या मार्गावर आहे

महिला समुपदेशन केंद्रात कौटुंबिक वाद आणि पती-पत्नी मतभेदांचे समुपदेशन घरगुती हिंसाचाराच्या प्रकरणांमध्ये मार्गदर्शन महिलांवरील अत्याचार, छळ, हुंडाबळी प्रकरणांमध्ये मदत घटस्फोट, पोटगी, मुलांच्या पालकत्वाबाबत माहिती मानसिक तणाव, नैराश्य आणि भावनिक समस्यांवर समुपदेशन कायदेशीर हक्क व योजनांची माहिती महिला सक्षमीकरण व आत्मविश्वास वाढीसाठी मार्गदर्शन महिला समुपदेशन केंद्राचे महत्त्व महिलांना मानसिक आधार मिळतो. कौटुंबिक वाद संवादातून सोडवण्यास मदत होते. महिलांना त्यांच्या हक्कांविषयी जागरूकता मिळते. अत्याचारग्रस्त महिलांना न्याय मिळविण्यासाठी मार्गदर्शन मिळते. आत्मनिर्भर आणि सशक्त समाज घडण्यास मदत होते.

कोण संपर्क करू शकते? विवाहित किंवा अविवाहित महिला घरगुती हिंसाचारग्रस्त महिला मानसिक तणाव किंवा कौटुंबिक समस्यांनी त्रस्त महिला कायदेशीर सल्ला किंवा मार्गदर्शनाची गरज असलेल्या महिला निष्कर्ष महिला समुपदेशन केंद्र हे महिलांच्या समस्या समजून घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी कार्य करणारे महत्त्वाचे व्यासपीठ आहे. महिलांना न्याय, सुरक्षा, मानसिक आधार आणि योग्य मार्गदर्शन देऊन त्यांना सशक्त बनविण्यात या केंद्रांची महत्त्वाची भूमिका आहे.



